जागतिक लिंगायत महासभा सोलापूर राजश्री थळंगे महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड
जागतिक लिंगायत महासभा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी येथील शंकरलिंग महिला मंडळाच्या सदस्या अक्कमहादेवी चित्रपटातील अभिनेत्री राजश्री थळंगे यांची महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र देऊन गौरविण्यात आले.

जागतिक लिंगायत महासभा सोलापूर राजश्री थळंगे महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड
सोलापूर
जागतिक लिंगायत महासभा सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव यांनी येथील शंकरलिंग महिला मंडळाच्या सदस्या अक्कमहादेवी चित्रपटातील अभिनेत्री राजश्री थळंगे यांची महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र देऊन गौरविण्यात आले.
येथील सिद्धरामेश्वर मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या एका साध्या समारंभात अनेक महिलांच्या उपस्थितीत जागतिक लिंगायत महासभेच्या सोलापूर जिल्हा महिला युनिटच्या माध्यमातून राजश्री थळगे यांना लिंगायत धर्म व बसावादी शरणांचे तत्व प्रचार आणि प्रसार करण्याची अधिक जबाबदारी देण्यात आली.
राजश्री थळंगे यांचे शंकरलिंग महिला मंडळ सोलापूर शहरात सांस्कृतिक व सामाजिक कार्य करत असून, गेल्या अनेक वर्षांपासून सर्व महिलांनी एकत्र येऊन ‘अमरज्योती अक्का’ या रूपक प्रयोग केला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर कर्नाटकातही त्यांनी अनेक प्रयोग सादर केले आहेत. अमरज्योती अक्क चित्रपट बनवून सर्वत्र प्रमोशन केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वीराटपुर वीरागी या चित्रपटात तिने आईची भूमिका साकारून लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी महिला लेझीम संघ तयार करून सिद्धरामेश्वरांचे वचनावर नृत्य सदर केले. अशा बहुगुणसंपन्न राजश्री थळंगे यांची आता जागतिक लिंगायत महासभेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा सोलापूरवासीयांमध्ये आनंद आहे.
महासभे चे बसवराज चाकाइ , शिवराज कोटगी , नागेंद्र कोगानुरे, मल्लिकार्जुन मुलगे , बसवराज बावे, काशिनाथ भतकुनकी, मल्लिनाथ थळंगे, गंगाधरा थळंगे, राजेंद्र हौदे आणि इतर अनेकजण उपस्थित होते.

युनिटचे अधिकारी
संचालिका – सिंधुताई काडादी
उपाध्यक्ष- प्रमिला चोरागी, निर्मला लातुरे, रेणुका बागलकोटे, संगीता भतकुनकी,
सरचिटणीस मीनाक्षी बागलकोटे,
सह सचिव – कविता हलकुडे, शोभा तोरणगी, विजयालक्ष्मी बिज्जरगी, सुनंदा मोटगी,
कोषाध्यक्षा- लता धनशेट्टी,
सदस्या – राजेश्वरी लोकापुरे, महादेवी धरणे, मीनाक्षी थळंगे , चिन्नम्मा बिज्जरगी, शशिकला रामपुरे, वीणा गडवीरा, रूपा धनशेट्टी, अर्चना कोरे, ज्योती भद्रेश्वरमठ, जगदेवी बिज्जरगी, रेखा माशाळ, कलावती स्वामी, सावीता गोगाव
