गावगाथाठळक बातम्या

Akkalkot : स्वातंत्र्य दिनानिमित्त सलगरचे ग्रामपंचायत सदस्य अमोल पुटगे यांच्या वतीने ‘वीजेचे खांब तिथे वीज आणि घर तिथे वीज’ उपक्रम

अक्कलकोट (प्रतिनिधी): ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले सलगरचे सुपुत्र अमोल पुटगे यांच्या संकल्पनेतून काल स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सलगर येथील भीमनगर परिसरात ‘वीजेचे खांब तिथे वीज आणि घर तिथे वीज’ उपक्रम राबविण्यात आला. स्व खर्चाने हजारो रुपये खर्च करून संपूर्ण भीमनगर परिसर प्रकाशमय करण्यात आले. यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते अमोल पुटगे हे विविध विकासकामांसाठी नेहमीच सकारात्मक असतात. या आधी देखील त्यांनी स्वतः चे लाखो रुपये खर्च करून संपूर्ण भीमनगरला पाण्याची व्यवस्था करून दिली होती. या शिवाय कोवीड काळात देखील अनेक गोरगरीब कुटुंबातील पीडीत रुग्णांना स्वखर्चाने वैद्यकीय साधने पुरविण्याचं काम देखील त्यांनी केला आहे. ‘असा कर्तुत्ववान नेता आम्हाला लाभला , हे आमचं भाग्य आहे’, अशा शब्दांत ग्रामस्थांनी अमोल पुटगे यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button