संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे आरोग्य शिबीर
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य तपासणी शिबीर व फुळ वाटप कार्यक्रम

संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे आरोग्य शिबीर


सोलापूर जिल्ह्या शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य तपासणी शिबीर व फुळ वाटप कार्यक्रम अक्कलकोट तालुका शिवसेनेच्या वतीने ठेवण्यात आले होते. प्रारंभी युवानेता मिलनदादा कल्याणशट्टी यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले रासपा पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते शिवसेना तालुकाप्रमुख संजय देशमुख रिपाई नेते अविनाश मडीखांबे डाॅक्टर सुवर्णाताई मलगोंडा प्रा.सुर्यकांत कडबगावकर स्वामीनाथ हेगडे वर्षा चव्हाण वैशाली हावनूर उमेश पांढरे विनोद मदने यांच्या उपस्थीतीत प्रतीमेची पुजा करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आले यावेळी कर्करोग तज्ञ डाॅ प्रथमेश मलगोडां यानी कर्करोग निदान व उपचार याबद्दल माहिती दिली कर्करोगाला घाबरुन जाऊनये ते उपचाराने कमी होऊ शकतो असे डॉ प्रथमेश मलगोंडा म्हणाले सर्व मान्यवरांचे सत्कार डॉक्टर अशोक राठोड डॉ करजखेडे यानी केले प्रस्ताविक तालुका प्रमुख संजय देशमुख यानी केले यावेळी सुनील बंडगर अविनाश मडीखांबे यानी मनोगत व्यक्त केले.


यावेळी पाचशे अठ्ठेचाळीस रुग्णाना तपासून योग्य ते उपचार करण्यात आले रुग्णाना महिला आघाडीच्या वतीने फुळे वाटप करण्यात आले यावेळी चंद्रकांत वेदपाठक अश्वीनी पाटील लता गायकवाड इंदुमती वाघमारे जयश्री कोलाटी अप्पासाहेब धुमाळ परशुराम जाधव लक्ष्मण पुजारी विशाल वांजरे पप्पू गुरव महिबुब शाबादे आशा वर्कर्स ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर्स कर्मचारी व नागरीक उपस्थित होते आभार प्रा.सुर्यकांत कडबगावकर यानी केले
