गावगाथा

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत प्रदर्शन

गड किल्ले, डॉक्टरांचा टेटसस्कोप, विविध घड्याळ, घर आणि इतर अनेक आर्ट व क्राफ्ट च्या वस्तूंचे प्रदर्शन दिनांक १६ व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस भरविण्यात आले आहे.

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत प्रदर्शन

HTML img Tag Simply Easy Learning    

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या आकलनशक्ती क्रियेटीविटी ने बनविलेल्या गड किल्ले, डॉक्टरांचा टेटसस्कोप, विविध घड्याळ, घर आणि इतर अनेक आर्ट व क्राफ्ट च्या वस्तूंचे प्रदर्शन दिनांक १६ व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस भरविण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

आज दिनांक १२ रोजी शाळेतील मुलांना पाहता यावे म्हणून याचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी, अडमिन ऑफिसर फादर शीनोय, उपमुख्यद्यापिका जसींता लोपीस, पर्यवेक्षिका निकोल डिसोझा आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.यात मुलांनी लाल किल्ला, शिवनेरी गड, तोरणा गड, रायगड बनविले आहेत.मुल स्वतः प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या वस्तूंची माहिती आणि ते आपण कसे तयार केले हे सविस्तरपणे भेट देणाऱ्याना सांगत आहेत

.

दिनांक १६ व १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते १२.३० आणि दुपारी २ ते ५ या वेळेत सर्वसामान्य नागरिक प्रदर्शन पाहू शकतील असे फादर निकी यांनी सांगितले. ही शाळा मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नेहमीच प्रयत्नशील असते.विविध सण उत्सव आणि इतर अनेक कार्यक्रम येथे नेहमीच मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button