स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

स्वामी प्रचितीचा साक्षात्कार अनुभवण्याची शक्ती ठायी हवी – वर्षा पटेल वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर व्यक्त केले मनोगत

वर्षा पटेल यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, दिलीप भाऊ सिद्धे व अन्य दिसत आहेत.

स्वामी प्रचितीचा साक्षात्कार अनुभवण्याची शक्ती ठायी हवी – वर्षा पटेल वटवृक्ष मंदिरात महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर व्यक्त केले मनोगत

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१२/१०/२३) –
अध्यात्मात आलेले अनुभव हे सांगायचे नसतात असे म्हणतात. मी स्वतः दोनवेळा अगदी जवळून स्वामींचे अस्तित्व अनुभवले आहे. स्वामींच्या मठात गेल्यानंतर मन खूप प्रसन्न आणि शांत होते. म्हणून आज येथे स्वामींच्या मूळ स्थानी वटवृक्ष मंदिरात स्वामींचे दर्शनाकरिता आलेलो आहे.
येथे येणार्‍या सर्व भाविकांच्या पाठीशी ते सदैव आहेत. फक्त श्रद्धेने येथे येऊन भाविक स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले पाहिजे. त्यांचा योगक्षेम चालविण्याकरिता ते स्व:त समर्थ आहेत हे त्यांचेच वाक्य आहे.
बऱ्याच वेळा असे सुद्धा झाले आहे की सहज म्हणून सुद्धा स्वामींच्या मठात जायची इच्छा झाली आहे, पण येण्या जाण्याच्या मार्गात असूनही जाणं झालं नाही. यालाच आपण स्वामी इच्छा सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे जोपर्यत देवाच्या मनात नाही तोपर्यंत भक्तांना दर्शन नाही. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी अंतर्मनात विश्वास असणे खूप गरजेचे आहे आणि तो नसल्यास एखादा साक्षात्कार होऊनही तुम्ही तो ओळखू शकणार नाहीत. तरीसुद्धा तुम्हाला जर काही जाणून घ्यायची इच्छा असेलच तर देऊळ बंद हा चित्रपट बघू शकता. काल्पनिक असला तरी आयुष्यात अशा अनेक घटना घडतात की ज्या आध्यात्मिक शक्तीशी संबंधित असतात, फक्त ती समजण्याईतकी जाण आपल्या ठायी असावी. असे अनेक किमया स्वामी या वटवृक्ष मठातून करीत आहेत. त्यामुळे स्वामी प्रचितीचा साक्षात्कार अनुभवण्याची शक्ती ठायी हवी असे मनोगत माजी केंद्रीय मंत्री व खा.प्रफुल्ल पटेल यांच्या धर्मपत्नी वर्षा पटेल यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी वर्षा पटेल यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. पुढे बोलताना वर्षा पटेल यांनी महेश इंगळे व कुटुंबीयांना पिढीजात स्वामी सेवेची संधी लाभली असल्याने इंगळे कुटुंबीयांची पिढी हे खूपच भाग्यवान असल्याचे मनोगत व्यक्त करून महेश इंगळे यांच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अक्कलकोट राष्ट्रवादीचे नेते दिलीप भाऊ सिद्धे, शिवकुमार स्वामी, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – वर्षा पटेल यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, दिलीप भाऊ सिद्धे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button