दुधनी येथील लिं.श्री म.नी.प्र.गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचे ६५ वा.पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन…
श्री.म.नी.प्र.राजशेखर महास्वामीजी यांचे पट्टाधिकार सुवर्ण महोत्सव व अमृत महोत्सव निमित्त गुरुवंदना समर्पणासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार
दुधनी येथील लिं.श्री म.नी.प्र.गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचे ६५ वा.पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन…
श्री.म.नी.प्र.राजशेखर महास्वामीजी यांचे पट्टाधिकार सुवर्ण महोत्सव व अमृत महोत्सव निमित्त गुरुवंदना समर्पणासह विविध धार्मिक कार्यक्रम होणार
अक्कलकोट :(प्रतिनिधी)
तालुक्यातील दुधनी येथील लिं. श्री म.नी.प्र. गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचे ६५ वा. पुण्यतिथीचे अवचित्य साधून श्री. म.नी.प्र.राजशेखर महास्वामीजी यांचे पट्टाधिकार सुवर्ण महोत्सव व अमृत महोत्सव निमित्त गुरुवंदना समर्पणासह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे माहिती विरक्त मठ दुधनीच्या वतीने एका पत्रकांमुळे दिली आहे.
श्री. म.नी. प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली श्री. म.नी.प्र.ली. गुरूशांतलिंगेश्वर महास्वामीजींच्या पुण्यस्मरण उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रम शटस्थल ध्वजारोहण रविवार दि.15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता श्री.म.नी.प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी विरक्त दुधनी यांची अमृत हस्ते होणार आहे.
या दिवशी रात्र 8 वाजता धर्मचिंतन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खेडगी विरक्त मठाचे श्री. म.नी. प्र. शिवबसवराजेंद्र महास्वामीजी व अक्कलकोट विरक्त मठाचे श्री. म.नी.प्र. बसवलिंग महास्वामीजीं यांच्या नेतृत्वाखाली व मैंदर्गी विरक्त मठाचे श्री. म. प्रा. महांत महास्वामीजीं, श्री.ष.ब्र. विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी अफजलपुर, श्री. ष. ब्र. शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ पडसलगी, श्री. ष. ब्र. शांतवीर शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ मादनहिप्परगा श्री. वीरपाक्ष देवरु शिवयोगी मंदिर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
रात्रो 9 वा. श्री अमोगसिद्ध डोळीन गायन संघ कोळूरगी आणि भीमाशंकर डोळीन गायन संघ बसवनबागेवाडी यांचे जुगलबंदी कार्यक्रम होणार आहे. श्री.म.नी. प्र.ली. परमपूज्य गुरुशांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचे पुण्यतिथीचे अवचित्य साधून श्री. म.नी. प्र. राजशेखर महास्वामीजी विरक्त मठ नंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे पट्टाधिकार सुवर्ण महोत्सव व अमृत महोत्सव निमित्त सोमवार दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता गुरुवंदना समर्पण आणि अड्डपालखी व श्री जंगम महागणाराधने व महाप्रसाद वितरण कार्यक्रम होणार आहे.
दुपारी ठीक 2:30 वाजण्याचा दरम्यान धर्मसभेचे आयोजन करण्यात आली आहे. सदरील कार्यक्रम श्री.म.नी. प्र. राजशेखर महास्वामीजी शांतलिंगेश्वर विरक्त मठ नंदगाव यांच्या अध्यक्षतेखाली तर श्री. म.नी. प्र. महांत महास्वामीजी विरक्त मठ नरोणा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. म.नी. प्र. शिवबसव राजेंद्र महास्वामीजी विरक्त मठ नागणसूर, श्री. ष. ब्र. डॉ चंन्नमल्लेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तेरीन मठ अफजलपुर, श्री. म.नी. प्र. प्रभूशांत महास्वामीजी विरक्त मठ हत्तीकणमस, श्री. म.नी. प्र. शिवलिंग महास्वामीजी विरक्तमट वागदरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. गफूर गवई, गुरुशांत गवई अल्लापूर व सिध्दण्णा कुंभार यांच्या संगीत कार्यक्रमा नंतर कार्यक्रम संपन्न होणार आहे.