सदानंद माळगे मित्र परिवारा तर्फे उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या सुनील टाकळे यांचा सत्कार…
सत्कार

सदानंद माळगे मित्र परिवारा तर्फे उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या सुनील टाकळे यांचा सत्कार…


पुणे – अक्कलकोट तालुक्याचे आळगी गावचे सुपुत्र जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचा विद्यार्थी मा सुनिल मल्लिकार्जुन टाकळे यांचे उपजिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील आळगी गावातील मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. आळगी गावचे पुण्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेल्या सुनील टाकळे याला मोलाचे मार्गदर्शन करणारे सदानंद माळगे यांच्या घरी छोटासा सत्कार करण्यात आले.
तसेच अन्वयी सदाशिव माळगे हिला 2 गोल्ड मेडल मिळाल्यामुळे नूतन उपल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नानासाहेब भगत,संदीप घोडके,राम कोळी,हजरत कुमठे,लालसहेब खसगी,सदाशिव माळगे, धोंडप्पा नंदे,महादेव खेड,लक्षम कोळी आदि मान्यवर उपस्थित होते
