नवरात्रीनिमीत्त वटवृक्ष मंदिरात देवी महात्म्य पोथी पारायण सेवेचे आयोजन ; देवस्थानचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली संपन्न होणार पारायण
दि.१९ ऑक्टोबर ते दि.२१ ऑक्टोबर ३ दिवसीय पारायण सेवा मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांची माहिती.

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१६/१०/२३) –
नवरात्र महोत्सवानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील ज्योतीबा मंडपात सालाबादाप्रमाणे यंदाही ३ दिवसीय देवी महात्म्य पारायण सेवेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. पुढे बोलताना इंगळे यांनी देवस्थानचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली गुरूवार दि.१९ ऑक्टोबर ते शनिवार दि.२१ ऑक्टोबर अखेर सकाळी ८ : ३० ते ११ या वेळेत ही देवी महात्म्य पोथीची पारायण सेवा संपन्न होईल.
गुरुवार दि.१९ रोजी पारायण सेवेपुर्वी कुंकूमार्चन होवून पारायण सेवेस प्रारंभ होईल. या देवी महात्म्य पारायण सेवेत दरवर्षी अनेक महिला देवी भक्त माता भगिनी सहभागी होवून या सेवेचा लाभ घेतात. मंदिर समितीच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्याखाली गेल्या ३१ वर्षांपासून दरवर्षी ही पारायणसेवा अखंडपणे देवीच्या चरणी समर्पित होत आहे. सालाबादा प्रमाणे यंदाही या उत्सवात व पारायण सेवेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून स्त्रीशक्तीचा सन्मान वाढवावा असे आवाहन इंगळे यांनी यावेळी केले आहे.