गावगाथा

सेंट टेरेसा शाळेत दसरा (विजया दशमी) निमित्ताने विशेष कार्यक्रम संपन्न

कार्यक्रमाने उपस्थितांवर कायमची छाप पाडली व प्रत्येकाने सत्याने वागून व सद्गुणांचे पालन करण्याच्या दृष्टीने आणि धार्मिकतेने मार्गदशित जीवनासाठी प्रयत्नशील राहायला हवे असा संदेश देण्यात आला

सेंट टेरेसा शाळेत दसरा (विजया दशमी) निमित्ताने विशेष कार्यक्रम संपन्न

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

 

वांद्रे पश्चिम येथील सेंट टेरेसा शाळेत येत्या २४ ऑक्टोबर रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या दसऱ्या (विजया दशमी) निमित्ताने नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता चौथी अ मधील विद्यार्थ्यांनी सादर केले.यावेळी राम, रावण, सीता, हनुमान, लक्ष्मण आणि रामायणातील इतर अनेक पात्रांच्या वेशभूषा मुलांनी केल्या होत्या.भगवान रामाने रावणावर मिळविलेला विजय म्हणजे सगुणांनी दुर्गुणावर मिळविलेला विजय, असत्यावर सत्याने केलेली मात. रावणामध्ये अहंकार, राग, लोभ, आळस, मत्सर, कपट, खोटेपणा व इतर अनेक दुर्गुण होते तर रामाकडे औदाऱ्य, कठोर परिश्रम, आनंद, प्रामाणिकपणा, पवित्रता, सहिष्णुता,आदी चांगले गुण असल्याने आजही लोक श्रीरामाचे नाव चांगल्या पद्धतीने घेतात दाखविण्यात आले.या शाळेत कायमच मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांना संधी दिली जाते, विविध कार्यक्रमात सामावून घेतले जाते.आताही चौथी अ च्या क्लास टीचर मीनल कुटीनो यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेचे प्रिन्सिपॉल फादर निकी आणि अडमिन ऑफिसर फादर शिनोय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुलांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मुलांना
तयार करण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतलेली दिसून आली

.या कार्यक्रमाने उपस्थितांवर कायमची छाप पाडली व प्रत्येकाने सत्याने वागून व सद्गुणांचे पालन करण्याच्या दृष्टीने आणि धार्मिकतेने मार्गदशित जीवनासाठी प्रयत्नशील राहायला हवे असा संदेश देण्यात आला..एकंदर सहभागी झालेली मुलं व त्यांचे पालक, शिक्षक व सर्वच यावेळी आनंदी असल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button