निवड /नियुक्ती

*चपळगांवच्या सरपंचपदी वर्षा भंडारकवठे यांची निवड..*

निवडीनंतर नुतन सरपंच वर्षा भंडारकवठे यांनी गावच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले

*चपळगांवच्या सरपंचपदी वर्षा भंडारकवठे यांची निवड..*

HTML img Tag Simply Easy Learning    

वर्गमित्रांची वचनपुर्ती पुर्ण
====================

HTML img Tag Simply Easy Learning    

चपळगांव प्रतिनिधी-चपळगाव ता.अक्कलकोट येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा भंडारकवठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.मंगळवारी सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.यामध्ये वर्षा भंडारकवठे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार कोळी यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
मागील पंचवार्षिक निवडणुकीत बाणेगांव-पाटील-भंडारकवठे गटाने चपळगांव ग्रामपंचायतीवर निर्विवाद वर्चस्व मिळविले होते.प्रत्येकी अडीच वर्षे याप्रमाणे सरपंचपदासाठी ठरले होते.ठरल्याप्रमाणे माजी सरपंच उमेश पाटील यांनी मागील महिन्यात सरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर जागा रिक्त झाली होती.यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक पार पडली.यावेळी माजी सरपंच उमेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे,बसवराज बाणेगांव,अप्पासाहेब पाटील,अंबणप्पा भंगे,महेश पाटील,अभिजीत पाटील, तंटामुक्त अध्यक्ष गंगाधर कांबळे, पोलिस पाटील चिदानंद हिरेमठ, महादेव वाले,पंडीत पाटील,ब.रे.मठदेवरू,राजा कोळी,करण कोळी,ग्रा.पं.सदस्य सुवर्णा गणपती कोळी,वंदना विलास कांबळे,धनश्री प्रदीप वाले,रेश्मा महिबुब तांबोळी,गौराबाई रमेश अचलेरे,गंगाबाई परमेश्वर वाले,चित्रकला वामन कांबळे,मल्लिनाथ सोनार,स्वामीनाथ जाधव,
खंडु वाले,मनोज इंगुले, सुरेश सुरवसे,सहायक निवडणूक अधिकारी योगेश जारवाल, ग्रामसेवक सोमलिंग कणगी, सुभाष वाघमोडे,कोतवाल दिपक कांबळे आदी उपस्थित होते.
निवडीनंतर नुतन सरपंच वर्षा भंडारकवठे यांनी गावच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.गावच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली व जल्लोष करण्यात आला.निवडणुक प्रक्रिया पार पडण्यासाठी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंभुलिंग अकतनाळ यांनी तर आभार विष्णु कांबळे यांनी मानले.
====================

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट वाक्य..

HTML img Tag Simply Easy Learning    

वर्गमित्रांची वचनपुर्ती..

HTML img Tag Simply Easy Learning    

मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी सरपंच उमेश पाटील व सामाजिक कार्यकर्ते सिध्दाराम भंडारकवठे या दोन वर्गमित्रांनी गावच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून पॅनल तयार करुन विजयश्री खेचुन आणले.ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात उमेश पाटील यांनी गावचे सरपंचपद भुषविले.वर्गमित्राला दिलेल्या वचनाप्रमाणे पाटील यांनी राजीनामा दिला अन् ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन मित्राच्या पत्नीला सरपंचपद मिळवुन दिले.दोघा वर्गमित्रांनी वचनपूर्ती पुर्ण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group