गावगाथा

अक्कलकोट जुना आडत बाजार मध्ये भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये मोकाट जनावरांचा व डुकरांचा धुमाकूळ

भाजीविक्रेते व नागरिक ह्या मोकट जनावराचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहेत...

अक्कलकोट जुना आडत बाजार मध्ये भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये मोकाट जनावरांचा व डुकरांचा धुमाकूळ

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट l शहर प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

येथील जुना आडत बाजार मध्ये भरणाऱ्या भाजी मार्केटमध्ये मोकाट जनावरांनी व डुकरांनी मोठया प्रमाणात धुमाकूळ घातला असून यामुळें नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून नागरिक मोठ्या अडचणी मध्ये आले आहेत

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट शहरातील रोजच्या भरणाऱ्या जुना आडत बाजार येथील भाजी मार्केटमध्ये मोकाट जनावरांचा व डुकरांचा मोठया प्रमाणात धुमाकूळ सूरू असुन याकडे अक्कलकोट नगरपरिषदेचे पुर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

गेल्या दोन-तीन दिवसापासून अक्कलकोट नगरपरिषद मार्फत बाजार कर पावती फी घेतलेल्या पावती देऊन दहा रुपये टेंडर धारकाला भाजी विक्रेते तक्रार करत आहेत जोपर्यंत या मोकट जनावरचा बंदोबस्त करत नाही तो तोपर्यंत आम्ही दहा रुपये देणार नाही. अशी तक्रार करत आहेत तरीसुद्धा तू दहा रुपये घेऊन जात आहे आणि या मोकट जनावरांचा बंदोबस्त काय करत नाहीत. अशी गंभीर परिस्थिती आहे. शहरातील रोजच्या भरणाऱ्या जुना आडत बाजार येथील भाजी मार्केटमध्ये मोकाट जनावरांचा व डुकरांचा धुमाकूळ सुरू आसून ही याकडे कुणाचे लक्ष नाही.
अक्कलकोट:- शहरातील जुना अडत बाजार येथील भाजी विक्रीते व्यापारी व नागरिकांत तीव्र संताप, सध्या सर्वत्र पाऊस नाही व सर्व धान्यें भाजीपाले ही महाग झाले आहेत बाजारात फिरणाऱ्या मोकाट जनावरे तोंड घालून भाज्यांची पेंड्या,टमाटे कांदे बटाटे व किराणा दुकानातील ज्वारी, तादुळ,धान्यें सर्व खात आहेत व शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा मोठा नुकसान करत आहे तसेच अक्कलकोट शहरातील भाजी खरेदीसाठी येणाऱ्या महिला,वयोवृद्ध,लहान लेकरे, गरोदर महिला हे भाजी खरेदी करण्यासाठी येत असतात. आणि भाजी मार्केट परिसरात दोन ते तीन ट्युशन सुद्धा आहेत त्या ट्युशन साठी विद्यार्थी विद्यार्थिनी हे सुद्धा मार्केटमधून येत जात असतात.आणि ह्या मार्केट भाजी मार्केट गर्दीमध्ये मोकट जनावरे सर्रास लोकांना ढकलून वाट कडतात.
मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास एका लहान मुलाच्या अंगावर एक मोकट जनावर मारण्यासाठी गेली होती आणि तो आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना गाडीमध्ये सापडला असता गाडीवाल्याने लगेच ब्रेक मारला कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या मोकट जनावरामुळे कुणाची जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण?
भाजीविक्रेते व नागरिक ह्या मोकट जनावराचा बंदोबस्त करण्याची मागणी करीत आहेत…
✍️ सोहेल फरास अक्कलकोट

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button