ग्रामीण घडामोडी

दक्षिण तालुका दुष्काळ जाहीर करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन,मा.पं.स.सदस्य धनेश आचलारे यांचा इशारा

शासनाने तालुका त्वरित दुष्काळ जाहीर करावेत अन्यथा, राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दक्षिण तालुका दुष्काळ जाहीर करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन,मा.पं.स.सदस्य धनेश आचलारे यांचा इशारा

HTML img Tag Simply Easy Learning    

दक्षिण सोलापूर तालुक्यात पुष्य नक्षत्र वगळता इतर नक्षत्र कोरडे गेल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.खरीप पिके करपून गेली आहेत. गावागावात हळूहळू आता, पाणी व चाराटंचाई निर्माण होत आहे.सीना-भीमा आणि हरणा या तीनही नद्या कोरड्या पडलेल्या आहेत.तालुक्यात अशी भीषण स्थिती असतानाही राज्य शासनाने दक्षिण सोलापूरला दुष्काळी यादीतून वगळले आहे. हा प्रकार संतापजनक आहे. शासनाने दक्षिण तालुका दुष्काळ म्हणून जाहीर करावा अन्यथा माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर-हैद्राबाद हा राष्ट्रीय महामार्ग रोखण्याबरोबरच चक्काजाम आंदोलन करू असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांनी दिला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी आचलारे म्हणाले,
यंदा रोहिणी, मृग, आर्द्रा,पुनर्वसु,आश्लेषा, मघा असे एकापाठोपाठ एक नक्षत्रे कोरडी गेल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यानंतर बोरामणी, तांदूळवाडी, मुस्ती, कुंभारी, वळसंग, आहेरवाडी,होटगी,हत्तूर मंद्रूप, बसवनगर, औराद, वडकबाळ,भंडारकवठे,कंदलगाव, वांगी, गुंजेगाव, टाकळी या परिसरात पुष्या नक्षत्रात चार- पाच दिवस संततधार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील तूर,मूग,उडीद,मटकी व इतर पिकांची पेरणी झाली.या पिकांची उगवणही चांगल्याप्रकारे झाली.मात्र,त्यानंतर आश्लेषा,मघा,पूर्वा,
उत्तरा, हस्त
ही नक्षत्रे कोरडी गेल्याने खरीप हंगामातील सर्व पिकांनी अक्षरशः माना टाकल्या आहेत.
शेतक-यांनी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन खरीप हंगामातील पिकांची पेरण्या केल्या आहेत.मात्र पाऊसच नसल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे.सावकारांकडून तसेच यापूर्वी बॅकेकडून घेतलेल्या पीककर्ज कसे फेडायचे तसेच वर्षभर प्रपंच कसे चालवायचे आणि पशुधन कसे सांभाळयाचे असा प्रश्न त्यांना सतावत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सध्या शेत-शिवा-यात आणि गावागावात भीषण पाणीटंचाई निर्माण होत आहे.पाऊस नसल्याने विहीर व बोअर तळ गाठला आहे.सीना व भीमा, हरणा नदीत अपेक्षित पाणीसाठा नसल्याने ऊसपिकेही पाण्याविना करपून जात आहेत.शेतात विजेचा वापर कमी असतानाही वीज मंडळ मात्र,शेतक-यांना भरमसाठ वीजबील माथी मारत आहे.त्यामुळे बळीराजा पूरता कोलमडून पडला आहे.तालुक्यातील ही भयाण स्थितीने सर्वांचीच झोप उडाली आहे.शासनाने तालुका त्वरित दुष्काळ जाहीर करावेत अन्यथा, राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे,आप्पा हलसगे,दाऊद मुजावर,बंडू मस्के,गणेश जांगटे,नारायण बोकडे,विक्रम मिटकरी,लक्ष्मण जाधव,नारायण जाधव,कृष्णा जाधव,बालाजी जाधव,चंद्रकांत चव्हाण,सोमनाथ विभुते,चन्नवीर बिराजदार, पांडुरंग वानकर, प्रशांत जाधव, राहूल जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येंने उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button