लोककलावंत पै. मजनूभाई शेख स्मृती गौरव पुरस्कार सोहळ्यात ग्रामीण कवी :
श्रीराम वि. घडे यांना राज्यस्तरीय ‘युवा प्रेरणा पुरस्कारने सन्मानित
अहिल्या नगर श्रीरामपूर (जि. अहिल्या नगर) येथील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजित लोककलावंत पै. मजनूभाई शेख स्मृती गौरव पुरस्कार सोहळ्यात परभणी जिल्ह्यातील मौजे डुमनरवाडी येथील आणि सध्या सध्या तळेगाव दाभाडे ता. मावळ जिल्हा. पुणे येथील ग्रामीण कवी मा. श्रीराम विध्यासागर घडे यांना राज्यस्तरीय युवा प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याच पुरस्कार सोहळ्यात सर्व मान्यवर आणि सर्व चित्रपट कलाकार यांच्या हस्ते शापित ग्रंथ या लघुचित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले आहे. चित्रपट दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी,आमदार च्या भूमिकेत काम करणारे रज्जाक भाई शेख, आमदार च्या पत्नी म्हणून काम करणाऱ्या स्मिता देशमुख मॅडम हवालदार या भूमिकेत काम करणाऱ्या वंदना नागणे मॅडम आणि श्रीराम घडे हे कलाकार उपस्थित होते. ग्रामीण कवी श्रीराम घडे यांनी शापित ग्रंथ या लघुचित्रपटात हवालदार शिंदे यांची भुमिका साकारली आहे.
तसेच मराठी साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण लेखन, सामाजिक विषयांवरील परखड मांडणी व युवा कविना मार्गदर्शन करणारे यांच्या साहित्यसेवेसाठी कवी श्रीराम घडे यांना युवा प्रेरणा हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्या साठी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. महावीरसिंग चौहाण, उदघाटक राणीताई सोनवणे,संदीप कुमार बोरकर,करण नवले, नानासाहेब डोंगरे,सुनीता वाळुंज,मोहिनीराज होन, प्रमोद सूर्यवंशी(शापित ग्रंथ चित्रपट दिग्दर्शक निर्माता), आणि स्वेता सावंत हे मान्यवर उपस्थित होते. आरटीओ च्या अधिकारी राणीताई सोनवणे यांच्या हस्ते ग्रामीण कवी श्रीराम घडे यांना युवा प्रेरणा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार दि. ३१ जानेवारी रोजी श्रीरामपूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या निवडीबद्दल साहित्यिक, सामाजिक व फिल्म क्षेत्रातून,ग्रामीण कवी श्रीराम घडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!