*छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक विचार जिजाऊकडूनच घेतला म्हणूनच शिवमार्ग यशवंत, जयवंत, किर्तीवंत झाले ; अलकाताई भोसले*
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या न्यासाच्या परिसरात असलेल्या कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान प्रतिमेचे पूजन हिरकणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले

*छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक विचार जिजाऊकडूनच घेतला म्हणूनच शिवमार्ग यशवंत, जयवंत, किर्तीवंत झाले ; अलकाताई भोसले*

अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक विचार जिजाऊकडूनच घेतला म्हणूनच शिवमार्ग यशवंत, जयवंत, किर्तीवंत झाले असल्याचे मनोगत हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापिका अध्यक्षा अलकाताई भोसले यांनी व्यक्त केल्या.*

त्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या न्यासाच्या परिसरात असलेल्या कार्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान प्रतिमेचे पूजन हिरकणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

पुढे बोलताना अलकाताई भोसले म्हणाल्या की, जिजाऊ यांच्या अनमोल, बहुमोल मार्गदर्शनामुळेच शिवरायांना राष्ट्र घडविता आले. या आदिशक्तीचे दर्शन सर्व जगाला राजमाता जिजाऊंच्या रूपाने घडलेअसे मनोगतातून त्यांनी व्यक्त केल्या.

यावेळी संस्थेचे सचिवा अर्पिताराजे भोसले, शोभा शेट्टी, कल्पना मोरे, सत्यभामा मोरे, अनिता गडदे, स्मिता कदम, स्वाती निकम, रूपा पवार, राजश्री माने, छाया पवार, संगिता भोसले, उज्वला भोसले, सुवर्णा घाडगे, पल्लवी नवले, कविता वाकडे आदीजण महिला वर्ग उपस्थित होते.
