*उमेश अशोक भगत (शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एस.एस.सी.’ सराव परीक्षेत भाग घेण्या-या विध्यार्थांचा सत्कार!*
सत्कार सन्मान

*उमेश अशोक भगत (शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एस.एस.सी.’ सराव परीक्षेत भाग घेण्या-या विध्यार्थांचा सत्कार!*

माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब* यांच्या प्रेरणेने तसेच *ना.एकनाथजी शिंदे*(मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य)आणि *मा.डाॅ.श्रीकांत शिंदे* (खासदार,कल्याण लोकसभा) यांच्या आदेशाने दिवा शहरातील *शिवसेनाच्या* वतीने *मा.रमाकांत मढवी* (शिवसेना,दिवा शहर प्रमुख तथा माजी ठा.म.पा.उपमहापौर) यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली *’एस.एस.सी.2024 ची सराव परिक्षा’* घेण्यात आली होती.
सदर परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले आहेत त्यांचा दिव्यातील आपपल्या विभागात सत्कार करण्यात आला.त्याच पार्श्वभुमीवर मंगळवार दि.20/02/2024 रोजी,आकांक्षा मंगल कार्यालय,आगसन रोड,आकांक्षा नगर दिवा (पूर्व) याठिकाणी *मा.उमेश अशोक भगत*(शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांच्या प्रमुख उपस्थितीत *’एस.एस.सी.सराव परीक्षेत’* भाग घेणा-या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष म्हमजे,*कु.तनिशा गायकर* या विद्यार्थ्यानीला सराव परीक्षेत *89% गुण* मिळाल्याबद्दल *उमेश भगत* यांच्या हस्ते *’सन्मान चिन्ह’* देऊन, सत्कार करण्यात आला.तर भगत यांचे सहकारी *सूर्यकांत कदम*(शिवसेना,दिवा पूर्व, उपविभाग प्रमुख),रविंद्र परब (शाखाप्रमुख),सतिश निकम (शाखाप्रमुख),नरेंद्र पाटील (शाखाप्रमुख),संतोष पेंढारी (शाखाप्रमुख),विशाखाताई इंदुलकर (महिला शाखा संघटक) या पदाधिका-यांच्या हस्तेहि विद्यार्थ्यांचा प्रमाण पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
सराव परीक्षे दरम्यान विद्यार्थ्यांची कसलीही गैरसोय होऊ नये याची पुरेपूर काळजी घेणारे *सचिन रोकडे* (शिवसेना,दिवा पूर्व मध्यवर्ती कार्यालय प्रमुख),सागर पवार, प्रतिक आयरे,अक्षय आडवळकर या कार्यकर्त्यांचाही उमेश भगत यांच्याहस्ते प्रोत्साहनपर *प्रमाण पत्र* देऊन,सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखाराम गोगावले,अवधूत पाटील, राकेश चव्हाण, सुजल पवार इत्यादि कार्यकत्यांनी परिश्रम केले.
