
अनंत चैतन्य प्रशाला, हन्नूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
—————————————-

विज्ञानाचे महत्त्व व उपयोग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, विज्ञानविषयकवृती वाढीस लागावा याकरिता तसेच विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विज्ञानाच्या फायद्याची माहिती व्हावे, विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी रमण इफेक्ट चे शोध लावलेले थोर भारतीय वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून आज बुधवार दि. २८ फेब्रुवारी रोजी महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था ,अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय ,हन्नूर येथे साजरा करण्यात आला. प्रारंभी जेष्ठ विज्ञान शिक्षक श्री. निंगप्पा बिराजदार यांच्या हस्ते महान वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर प्रशालेच्या इ. ८वीच्या विद्यार्थिनी कु. अर्शिया सिंदखेडे व कु. लक्ष्मी घोडके यांनी अतिशय सुंदर विज्ञान गीत सादर केल्या या प्रसंगी कु.जरीना पटेल ( इ. ५वी) व कुमार योगेश पवार ( इ. ८वी) यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विलास बिराजदार यांनी रोख बक्षीस देऊन प्रोत्साहित केले.तदनंतर प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ. स्वप्नाली जमदाडे यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. विलास बिराजदार, पर्यवेक्षक श्री.अशोक साखरे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अप्पासाहेब काळे, जेष्ठ शिक्षक श्री. ज्ञानदेव शिंदे, सरदार मत्तेखाने, शहाजी माने, सुरेश जाधव, राजेंद्र यंदे, अब्दुलअझीझ मुल्ला,प्रा. रविंद्र कालीबत्ते, रमेश शिंदे काशीनाथ पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम सहाय्यिका सौ.मल्लम्मा चप्पळगाव मॅडम यांनी केले.
