
“ग्रंथ वाचनाने मनाची प्रगल्भता वाढते “—–प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार
——————————————-
सोलापूर दि.15 ग्रंथ हे ख-या अर्थाने गुरु रुपाने मार्गदर्शन करीत असतात.त्यान्च्या आधाराने मानव प्रगतीचे अनेक टप्पे पार करीत असतो.ग्रंथाच्या माध्यमातून नवे सिध्दान्त उदयाला येतात.मन,मनगट आणि मस्तक मजबूत करण्याचे कार्य ग्रंथ करतात. यासाठीच वाचन ,मनन ,चिंतन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार यान्नी माजी राष्ट्रपती डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यान्च्या जयंतीनिमित्त आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कलाम यान्च्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांकडून करण्यात आले. श्री सिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय कर्णिक नगर,श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय निलम नगर यान्च्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल गुरुनाथ हत्तीकाले यानी केले.व कलाम यान्च्या जीवनातील धीरोदात्त संघर्षमय घटनांबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमास किरण भंडारे,श्रीशैल शिल्ले,अजय श्रीराम,नरसिंग मिसालोलू,अत्तार भाई व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शन ग्रंथपाल अश्विन कुमार जम्मा केले.
