गावगाथा

श्री गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजींचे 91 वे पुण्यस्मरणोत्सवानिमित्त ‘श्रीं’चे तैलचित्राचे व ग्रंथांचे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत श्री.म.नि.प्र. डॉ.अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजींचे पूजा अर्चा, महामंगल करून उत्सव संपन्न

मिरवणूक यशस्वी होण्यासाठी भक्त व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. तब्बल 23 तासाने श्री मठात मिरवणूकीची जय बसवा, जय जय बसवाच्या जयघोषात सांगता करण्यात आली.

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*तालुक्यातील नागणसूर येथील श्री गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजींचे 91 वे पुण्यस्मरणोत्सवानिमित्त ‘श्रीं’चे तैलचित्राचे व ग्रंथांचे काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत श्री.म.नि.प्र. डॉ.अभिनव बसवलिंगेश्वर महास्वामीजींचे पूजा अर्चा, महामंगल करून उत्सव संपन्न झाला.*

या मिरवणुकी दरम्यान नवस मागून घेतलेल्या भक्ताने श्रीच्या तैलचित्रास पैशांच्या नोटांचे हार घालून नवस फेडले. तर काही भाविकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मिरवणुकीस आलेल्या सर्व भाविकांची सेवा केले. त्यात निलप्पा प्रचंडे, शरणप्पा प्रचंडे बंधूनी दोन ट्रॅक्टर ऊस आणून रात्रभर सर्वांना मोफत ऊसाचे रस वाटप करुन सेवा रुजविले.

मोरे बंधूनी 300 लिटर दूधखीर, जोड हनुमान गल्लीतील युवकाने 400 लिटर दूधखीरचे वाटप केले. श्री मल्लिकार्जुन गल्लीतील तरुण मंडळांनी अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. प्रत्येक गल्लीतील तरुण मंडळांनी चहा-बिस्कीटची सोय केले. नागणसूर येथील नूतन पोलिस म्हणून नियुक्त झालेले युवकांनी भक्तांना चहाचे व्यवस्था केली.

या मिरवणुकीसमोर ‘शिव की काशी, अयोध्या का राम, संपूर्ण मथुरा, श्रीकृष्ण का धाम, गंगा आरती देखावा सादर केले तर प्रचंडे प्रशालेतील विद्यार्थिनींनी नृत्य व बाहूल्यांचा अनोखा देखावा सादर केला. वेगवेगळ्या तरुण मंडळांनी लेझीम, टिपर्‍या, नृत्य सादर केले.

श्री गुरु बसवलिंगेश्वर महास्वामीजींच्या तौलचित्राचे मिरवणूक बैलगाडीमधून सूर्यकांत गंगोंडा, काशिनाथ भासगी व लक्ष्मण सालूटगी यांच्या बैलजोडीने गाडी ओढून सेवा केली. सदर मिरवणूक यशस्वी होण्यासाठी भक्त व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. तब्बल 23 तासाने श्री मठात मिरवणूकीची जय बसवा, जय जय बसवाच्या जयघोषात सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button