गावगाथा

एकच मिशन मराठा आरक्षण!’ मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याकरिता अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधवांनी एकत्रित येवून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा

साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आले.

अक्कलकोट दि. 30 :
‘एकच मिशन मराठा आरक्षण!’ मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याकरिता अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधवांनी एकत्रित येवून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सोमवारपासून साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    


दरम्यान सकल मराठा समाजाच्यावतीने संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित साखळी उपोषणास शिवछत्रपती शिवजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पुजनाने साखळी उपोषणास सुरूवात करण्यात आली.
याप्रसंगी सकल मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सुर्यवंशी, अ‍ॅड. शरदराव फुटाणे-जाधव, शिवाजीराव पाटील, महेश इंगळे, अमोलराजे भोसले, स्वामीराव मोरे काका, सोपानराव गोंडाळ, श्रीमती ताराबाई हांडे, माया जाधव, मिरा ब्रद्रुक, बाळासाहेब मोरे, सुधाकर गोंडाळ, बापूजी निंबाळकर, अरुण साळुंके, सुभाष गडसिंग, स्वामीराव सुरवसे, तम्मा शेळके, संजय मोरे, स्वामीराव मोरे, बापूजी निंबाळकर प्रदिप तोरसकर, प्रदिप जगताप, बाबासाहेब पाटील, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होेते.
या साखळी उपोषणास माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अप्पापासाहेब पाटील, शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख, शिवा संघटनेचे प्रा. परमेश्वर आरबाळे, माजी नगरसेवक महेश हिंडोळे, प्रा. किशनराव झिपरे, शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुखा आनंद बुक्कानुरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर, रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, शहर अध्यक्ष अजय मुकणार, रासपचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रासपचे अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष दाजी कोळेकर, तालुका उपाध्यक्ष विलास पाटील, सलगर जिल्हा परिषद गट प्रमुख रेवणसिध्द शेरी,रिपाइंचे जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, तालुका सरचिटणीस राजु भगळे, तालुका कार्याध्यक्ष राजू बोरगांवकर, युवक तालुकाध्यक्ष अप्पा भालेराव, गुरुशांत दोडमनी, विजयकुमार पोतेनवरु, विठोबा कोळेकर, नागनाथ शिरोळे, अंबादास शिंगे, कृष्णा दोडमनी, दस्तगीर मुजावर, तम्मा दसाडे, बंटी मडिखांबे, दत्ता कांबळे, सनी सोनटक्के, वासू कडबगावकर, शुभम मडिखांबे, सत्तारभाई शेख बासलेगावले, मैनुद्दिन कोरबू, भिमा मलवे, अंकुश चौगुले, सिध्दाराम माळी, प्रितिश किलजे, मोतिराम राठोड, नागनाथ कुंभार, पिंटू दोडमणी, चंद्रकांत गायकवाड, केदार माळशेट्टी, निखिल पाटील, अभिजीत लोकापुरे, आदीजणांनी उपस्थित राहून पाठिंबा दिले.
या प्रसंगी बोलताना रासपचे सुनिल बंडगर, आरपीआय आठवले गटाचे अविनाश मडिखांबे, शहर अध्यक्ष अजय मुकणार, लहूजी शक्ती सेनेचे वसंतराव देडे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत इतिहासाचे विवेचन करून मराठा समाजाला आरक्षण मिळोतोपर्यंत आमचा पाठिंबा असल्याचे उभयत्यांनी सांगितले. तर शिवा संघटनेचे प्रा. परमेश्वर आरबाळे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या मराठा आरक्षण भुमिकेबाबत कडत शब्दात तोफ डागली. केंद्र सरकार ज्या प्रमाणे एखाद्या विषयी विशेष अधिवेशन बोलवते, तसेच अधिवेशन केंद्राने बोलवावे, अन्यथा मराठा समाज ‘देता का जाता’ हे सुनावेल. याचा परिणाम आगामी निवडणूकीत निश्चित होणार असे प्रा. आरबाळे म्हणाले.
या बरोबरच पुढे बोलताना महेश इंगळे म्हणाले की, सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मनोज जरांगे-पाटील हे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत आहेत. मराठा समाजातील युवक आता रस्त्यावर उतरला आहे. आता माघार नाही, आता समाज स्वस्थ बसणार नाही. अ‍ॅड. शरद फुटाणे म्हणाले की, या निमित्त्याने मराठा समाजातील ऐक्य पहायला मिळत आहे. मात्र आरक्षणाचा मुद्दा कळीचा असून या करिता राज्य सरकारकडून आरक्षण मिळण्याकामी त्वरीत कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड. फुटाणे यांनी केली. जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील यांनी देखील राज्य व केंद्र सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्याकामी योग्य ती उपाययोजना करणे, व जरांगे -पाटील यांचे उपोषण गांभीर्याने घेणे आवश्यक आहे असे सांगितले. तम्मा शेळके, बाळासाहेब मोरे, सुभाष गडसिंग यांनी देखील आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून होत असलेल्या चालढकली मुळे आज हे मराठा समाजात वातावरण निर्माण झाले आहे. मनोज जरांगे-पाटील यांची तब्बेत खालावत चालली असून त्याबाबत सरकारकडून बघ्याची भूमिका घेऊ नये सरकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे, काहीजण मराठा आणि ओबीसी यांचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केले.उपविभागीय अधिकारी विठठलराव उदमले यांनी उपोषणा सथली भेट दिले.
याप्रसंगी तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांना सकल मराठा समाजाच्या वतीने समाजाला त्वरीत आरक्षण मिळण्याकामी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बाळासाहेब शिरसाट यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेले निवेदन त्वरीत राज्य शासनाला कळवू असे सांगितले. त्यांच्या समवेत उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र हे उपस्थित होते.
यावेळी प्रदिप जगताप, मनोज निकम, प्रविण देशमुख, कुमार सुरवसे, बाबासाहेब पाटील, वैभव नवले, प्रथमेश इंगळे, शितल जाधव, संजय गोंडाळ, प्रविण घाटगे, योगेश पवार, वैभव मोरे, प्रथमेश पवार, स्वामीराव मोरे, संतोष भोसले, पिटू साठे, आकाश शिंदे, सागर गोंडाळ आतिश पवार, मनोज गंगणे, गोटू माने, टिनू पाटील, बालाजी पाटील, प्रविण बाबर, निखिल पाटील, राजेंद्र पवार, रणजित जाधव, ज्ञानेश्वर भोसले, श्रीशैल कुंभार, समर्थ घाटगे, महेश दणके, राम जाधव, रवि कदम, अंकुश पवार, आकाश गडकरी, सुनिल पवार, गोविंदराव शिंदे, रोहन शिर्के, भरत राजेगावकर, अंकुश पवार, पप्पू गडदे, राजू माकणे, पवन पाटील, किरण जाधव, अभय जगताप, ज्योतीबा चव्हाण, स्वामीनाथ बेंद्रे, पिंटू मचाले, ओंमकार महाडिक, ज्ञानेश्वर पुजारी, किरण साठे, सुरेश कदम, नितीन शिंदे, अमित थोरात, नितीन शिंदे, गोरखनाथ माळी, बालाजी कठारे, कल्याणराव देशमुख, सागर गोंडाळ, गिरीष पवार, राहूल इंडे, प्रकाश लोंढे, गणेश लांडगे यांच्यासह शहर व तालुक्यातील बहुसंख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होता. बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button