गावगाथा

मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याकरिता अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधवांनी एकत्रित येवून साखळी उपोषणास प्रारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला

दरम्यान सकाळी दहा वाजलेपासून एसटी सेवा बंद ठेवण्यात आले होते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली होती. दुपारच्या नंतर एसटी पुर्ववत करण्यात आल्याने शालेय विद्यार्थी, अबाल वृध्दांनी एकच सुटकेचा श्वास सोडला.

मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याकरिता अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधवांनी एकत्रित येवून साखळी उपोषणास प्रारंभ आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला

*🔶अक्कलकोट* : (प्रतिनिधी)
*मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याकरिता अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधवांनी एकत्रित येवून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवित सोमवारपासून साखळी उपोषणास प्रारंभ केला. दुसर्‍या दिवशी दहिटणे व चपळगांव येथील मराठा समाज बांधव उपोषणास बसले. दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.*

यावेळी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष एजाज मुतवल्ली, कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष अरुण लोणारी, नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विभुते, शिवा संघटना ता.अध्यक्ष मल्लिनाथ पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी व्हीजेएनटीचे पदाधिकार्‍यांसह आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा, माजी जि.प.सदस्य मल्लिकार्जुन पाटील, शिवराज स्वामी, मल्लिनाथ करपे, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष फैजअहमद ननू कोरबू, मैनुद्दीन कोरबु, सुदर्शन विभुते, राजेश कोरे, माजी नगरसेवक सद्दाम शेरीकर, अकील बागवान, पद्माकर डिग्गे, सलीम येळसंगी, शबाब शेख, सोमनिंग सुरवसे, हाजी नूर अहमद बागवान, प्रशांत विभुते, असिफ जमादार, व्यंकटेश विभुते, आलिबाशा अत्तार, अरविंद विभुते, वली कुरेशी, सलीम बाग, सरू शेख, इब्राहिम कारंजे, अमीन मुजावर उपस्थित होते.

दरम्यान सकाळी दहा वाजलेपासून एसटी सेवा बंद ठेवण्यात आले होते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची तारांबळ उडाली होती. दुपारच्या नंतर एसटी पुर्ववत करण्यात आल्याने शालेय विद्यार्थी, अबाल वृध्दांनी एकच सुटकेचा श्वास सोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button