गावगाथा

आमचे जीवन देशसेवेसाठी तर महेश इंगळेंचे जीवन धर्मसेवेसाठी समर्पित – कर्नल रसपाल सिंग

कर्नल रसपालसिंग यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

आमचे जीवन देशसेवेसाठी तर महेश इंगळेंचे जीवन धर्मसेवेसाठी समर्पित – कर्नल रसपाल सिंग

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.३१/१०/२३)
राष्ट्रीय सैन्य दलातून आम्हाला देशसेवेची संधी मिळालेली आहे, तर येथील मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून धर्मसेवेची संधी मिळालेली आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना प्रामाणिक सचोटीने काम केल्यास त्या व्यक्तीच्या कर्तुत्वाची झळाळी उत्तुंग भरारी घेत असते, या भावनेतूनच समर्पित वृत्तीने सैन्य दलात काम करताना देश सेवेत जीवन व्यतीत होत असल्याचे मोठे समाधान आहे.
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे ही अत्यंत समर्पित भावनेने जीवन स्वामींच्या चरणी अर्पण केले आहे, म्हणून आमचे जीवन देश सेवेसाठी तर महेश इंगळेंचे जीवन धर्म सेवेसाठी समर्पित असल्याचे मनोगत कर्नाटकच्या विजयपूर येथील कर्नल रसपाल सिंग यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी कर्नल रसपाल सिंग यांचा वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी कर्नल रसपाल बोलत होते. पुढे बोलताना कर्नल रसपाल सिंग यांनी श्री स्वामी समर्थांची ख्याती व समर्थांचा महिमा संपूर्ण जगभर भाविक अनुभवत आहेत, म्हणून स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता स्वामीभक्त नेहमीच उत्सुक असतात. भाविकांच्या या श्रद्धेय भक्तीला सेवा देण्याकरीता उदात्त हेतूने महेश इंगळे यांनी स्वामी सेवेत स्वतःला वाहून घेतलेले आहे. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक भाविक समाधानाने स्वामी दर्शन घेऊन परतत असल्याचे मनोगतही व्यक्त केले. त्याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, मेजर संतोष रावले, राहुल इंडे, शिवू स्वामी, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगणुर, अक्षय यळवंडे, सागर याळवार, महेश आहेरकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – कर्नल रसपालसिंग यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button