दिवाळीनिमित्त अन्नछत्र मंडळातील सेवेकऱ्यांना दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते वाटप
दिवाळी भेट

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीनिमित्त अन्नछत्र मंडळातील सेवेकऱ्यांना दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाटप प्रमुख कार्यकारी विश्व्स्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.*


अन्नछत्र मंडळाच्या यशस्वी वाटचालीसाठी सेवेकऱ्यांचा बहुमोल वाटा आहे. सामाजिक बांधिलकीतून त्यांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने त्यांना फराळासाठी लागणारे साहित्य देण्यात आले.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे,बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, धानप्पा उमदी, रोहित खोबरे, संभाजीराव पवार, निखील पाटील, बाळासाहेब घाटगे, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शिवू काळे, सुभाष मडीखांबे, सागर सुतार, नवनाथ सुतार, शावरप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगणुर, शिवराज स्वामी, निंगप्पा बिराजदार, सुमित कल्याणी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
