कुर्ला गांधी बाल मंदिर हायस्कूल मध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न
दिवाळी विशेष.. दिवाळी पहाट

कुर्ला गांधी बाल मंदिर हायस्कूल मध्ये दिवाळी पहाट कार्यक्रम संपन्न

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

दीपावली म्हणजे दीपानाम आवति: दिव्यांची ओळ सर्वांच्या मनात हर्षोल्हास निर्माण करणारा सृजनशील विचारांना जागृत करणारा असा हा सण दिवाळी. हिंदू संस्कृती आणि संस्कारांना उजाळा देणारा ! गान्धि शाळेत या निमित्ताने दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. कविता केसरकर आणि त्यांच्या टीमने सुंदर अशा रांगोळ्यांनी तोरणांनी शाळा सजविली. रात्नकान्त विचारे, अशी कोळंबेकर, विश्वनाथ पांचाळ या शिक्षकांनी सुंदर असे फलक लेखन आणि रांगोळीच्या आई आणि शाळा सुशोभित करण्यात आली. सदर कार्यक्रमास ज्योती निसळ मॅडम, स्पृहा इंदू मॅडम, कुंदन गुरव माजी विद्यार्थी प्रशांत नलावडे, माजी मुख्याध्यापक, श्री दीपक हेदुळकर , सौ सोनल साटेलकर मॅडम, सचिव हे सर्व मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात सर्व विद्यार्थी यांनी सुमधुर गीतांचा नृत्याचा कार्यक्रम सादर केला. सर्व विद्यार्थ्यांना एक वही, सुगंधी उटणे व दिवाळीचा फराळ देण्यात आला. सदर कार्यक्रम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रमोद पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
