गावगाथा

बहुआयामी व्यक्तिमत्त्व:- संतोष शिंदे

वाढदिवस विशेष

बहुआयामी व्यक्तिमत्त्व:- संतोष शिंदे

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पत्रकार, साहित्यिक, उद्योजक म्हणुन ओळख असलेले संतोष दत्तू शिंदे यांचा वाढदिवस २४मे त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल घेतलेला संक्षिप्त आढावा , संतोष दत्तू शिंदे यांचा जन्म उक्कडगाव ता.श्रीगोंदा येथे आईच्या आजोळी एका चर्मकार समाजात आई चांगुणा,वडील दत्तू शिंदे यांच्या पोटी२४मे १९८० रोजी झाला.
लहानपणापासूनच संतोष शिंदे हे शांत ,संयमी ,प्रेमळ स्वभावाचे होते.लहाणपणी जर एखादा पेपरचा कागद उडुन जात असला तर संतोष शिंदे त्या पेपरच्या मागे धावायचे जणु काही हा संदेशच त्यावेळी कळत नकळत मिळाला असावा.आज असा कोणताही पेपर नाही ज्यात संतोष शिंदे यांचे पेपरला नाव नाही.
प्राथमिक शिक्षण पाचपुतेवाडी येथे तर जि.प.प्राथमिक शाळा काष्टी येथे झाले
आपले माध्यमिक शिक्षण५वी ते १२वी १९९१ ते १९९८साली जनता माध्यमिक विद्यालयात पुर्ण केले.आई वडीलांना मुलगा शिकतोय याचेच अप्रूप वाटायचे,मार्क खुप पडावे अशी त्यांची अपेक्षा नव्हती.दरवर्षी मुलगा पुढच्या वर्गात जातोय याचा अभिमान वाटायचा.पुढे १२वी नंतर काय हा प्रश्न पडला कारण घरात कोणी शिकलेले नाहीत.आई तर शाळेत गेलीच नव्हती तर वडील जुनी ४थी शाळा शिकलेले.थोडफार लिहायला ,वाचायला यायचं .
पुढे वडीलांच्या एका मित्राच्या मदतीने निमगाव म्हाळुंगी या.शिरूर येथे कृषी पदवी कोर्सला धाडले .१९९८ते २०००पर्यत हा चांगल्या मार्कांनी पुर्ण केला.त्यातच पुढे भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान उरूळीकांचन येथे बीएस्सी ॲग्रीच्या कोर्स २००१ते २००६ साली पुर्ण केला.यादरम्यानच शिक्षण घेत असताना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आसु या गावातील कांबळे कुटुंबातील सोनाली यांच्याशी त्यांचा विवाह २६नोव्हेंबर २००३रोजी झाला.
लग्न झाल्यामुळे जबाबदारी वाढली .आई वडीलांच्या कष्टाची जाण होती.त्यामुळे २००९ साला पर्यंत वडीलांच्या दुकानात वडीलांना मदत करू लागले.या दरम्यान नोकरीसाठी अनेक ठिकाणी प्रयत्न केले.शेवटी नोकरी न मिळाल्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहायचे ठरवले‌.२००९साली काही काळ मार्केटिंग क्षेत्रात नशीब आजमावले ,फुटवेअर,हाॅटेल व्यवसाय ,रसवंती गृह काही काळ चालवले.यात कुठेच जय बसेना म्हणून कुषन्स व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.या व्यवसायात मात्र संतोष शिंदे यांनी चांगला जम बसवला
आज पंचक्रोशीत श्रीगोंदा, दौंड,शिरूर तालुक्यातील ग्राहक वर्ग शिंदे यांच्याकडे कुषन्स साठी येतात.संतोष कुषन्स म्हणुन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
बिकट परीस्थीतीवर मात करून शिंदे यांनी आपले ध्येय पुर्ण केले आहे.त्यांचे
यश तरूणांसाठी प्रेरणादायी आहेच तर आदर्श घेण्यासारखे आहे.उद्योजकतेबरोबरच संतोष शिंदे यांनी लेखनाची आवड जोपासली आहे.दुर्मिळ नाण्यांचा संग्रह केला आहे.पत्रमैत्री हा छंद ते आजतागायत जपत आहे.दै.युवा सकाळ मध्ये २००३ साली संगणक शिक्षण काळाची गरज हा लेख फोटोसह छापुन आला.आणि तेथुन शिंदे यांना लेखनाची आवड निर्माण झाली.ती आजतागायत जपली आहे.हजारोहुन अधिक लेख प्रकाशित झाले आहे.
समाजप्रबोधनपर लेखन ते करतात. मित्रपरिवार जोपासला आहे.याचबरोबर, पत्रकार म्हणून ते सर्वांना परीचीत आहे.दै.लोकमत,दै.पुण्यनगरी,दै.देशदुत,दै.सार्वमत,दै.प्रभात,दै.कर्मभुमी,दै.भुमीपुत्र टाईम्स,दै.जनतेचा जनदूत,दै.जलभूमी,दै.भारत भ्रमर, साप्ताहिक निळे वादळ, साप्ताहिक गावगाथा, साप्ताहिक रविदास मार्ग, पाक्षिक प्रगत महाराष्ट्र, यांसारख्या नामांकित दैनिकात पत्रकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
आपण या समाजाचे देणे लागतो.या प्रमाणे समाजप्रबोधनपर लेखन ते करत आहेत.वाचनाचा प्रचंड व्यासंग आहे.अनेकांना त्यांनी पुस्तके भेट दिली आहेत.श्रीगोंदा तालुका ग्रामीण पत्रकार संघ, शब्दगंध साहित्यिक परीषद तालुका अध्यक्ष, ग्राहक जागृती मंच, अंधश्रद्धा निर्मूलन, महाराष्ट्र चर्मकार महासंघ, निसर्ग पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणुन काम पाहिले आहे.निसर्गप्रेमी आहेत.त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना गौरविले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील शांत,संयमी,सतत हसतमुख,प्रेमळ स्वभावाचे पत्रकार, साहित्यिक, उद्योजक म्हणुन स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण केली आहे.आज या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड दिर्घायुष्य लाभो हिच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना,
शब्दांकन:- धोंडप्पा नंदे , साप्ताहिक गावगाथा ,संपादक

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button