दिपावलीच्या मंगल पर्वावर वटवृक्ष मंदिरात पहाटगाण्यांचा सुमधूर स्वराविष्कार
या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231027-WA0024-400x470.jpg)
दिपावलीच्या मंगल पर्वावर वटवृक्ष मंदिरात पहाटगाण्यांचा सुमधूर स्वराविष्कार
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी सदगुरु श्री स्वामी समर्थांच्या चरणी वंदन करून यंदाच्या दिपावलीच्या शुभ मुहुर्तावर येथील श्री वटवृक्ष मंदिरात पहाटगाण्यांचा सुमधूर स्वराविष्कार व अभंगसंध्या ह्या भावभक्ती संगीताचा कार्यक्रम दिनांक १२/११/२३ ते दिनांक १४/११/२३ अखेर आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
मनोहर देगांवकर (बी.एस.सी.बी.एड.एम.ए.) व संतोष देगांवकर (एम.ए.एम.फील.पी.एच.डी.) संगीत व कीर्तन अलंकार अक्कलकोट यांच्या सुमधूर स्वरातून पहाट गाणी (भावमय स्वरांजली) रविवार दिनांक १२/११/२०२३ रोजी पहाटे ५: १५ ते सकाळी ८ पहाटगाणी, सायं ५ ते ७ अभंगसंध्या, सोमवार दि.१३/११/२३ रोजी पहाटे ५:१५ ते सकाळी ८ पहाटगाणी, मंगळवार दि. १४/११/२३ रोजी सायं ५ ते ७ या वेळेत अभंगसंध्या कार्यक्रम सादर होतील. तसेच सोमवार दि.१३ नोव्हेबर रोजी सोलापूरचे सुप्रसिद्ध गायक विलास कुलकर्णी व रमा कुलकर्णी यांच्या भक्ती संगीताचा कार्यक्रम हार्मोनियम वादक ओंकार पाठक व तबलावादक नितीन दिवाकर यांच्या सहकार्याने सायंकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत संपन्न होईल. वरील सर्व कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतीबा मंडपात नियोजीत तारखेस व वेळेवर श्रींच्या चरणी सादर होतील, तरी दिपाववलीनिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)