ऊसतोड कामगारांच्या हस्ते गावगाथा दिवाळी अंकाचे प्रकाशन..
हटके पध्दतीने गावगाथा दिवाळी अंक २०२३ प्रकाशन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/11/20231111_112519-736x470.jpg)
ऊसतोड कामगारांच्या हस्ते गावगाथा दिवाळी अंकाचे प्रकाशन..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
हटके पध्दतीने गावगाथा दिवाळी अंक २०२३ प्रकाशन
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
वागदरी – सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे चक्क शेत शिवारात गावगाथा दिवाळी अंकाचे प्रकाशन संपन्न झाले.
सध्या ऊस हंगाम सुरू आहे.सागंवी येथील एका शेतात ऊसतोडणी कामगारांच्या हस्ते गावगाथा दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.छोट्याखानी कार्यक्रम अचानक झाल्याने ऊसतोडणी करणारे कामगाराच्या चेहरावर वेगळेच आंनद दिसून आले.
पहिल्यांदाच चक्क एका दिवाळी अंकाचे प्रकाशन शेत शिवारात करण्याचा योग आला.यावेळी या मागचं हेतू सांगताना गावगाथाचे संपादक म्हणाले की गावगाथा ग्रामीण संस्कृती परंपरा जपणारे परिपूर्ण अंक असून ग्रामीण भागातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सहवासात अंक प्रकाशन करण्याचा कल्पना सूचली आणि तात्काळ ऊस तोडणी कामगारांच्या हस्ते प्रकाशन करून यंदाचा गावगाथा अंक अर्पण करण्यात आले.यावेळी संपादक धोंडपा नंदे व विजय कांबळे उपस्थित होते.
तसेच वागदरी सह अक्कलकोट सोलापूर येथे गावगाथा अंक उपलब्ध आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)