गावगाथा

अक्कलकोट ते कंटेहळी ,,बस सेवा, चालू करा वंचित बहुजन आघाडीची मागणी

आगार व्यवस्थापक श्री जूनैदी साहेब यांना निवेदन

अक्कलकोट ते कंटेहळी ,,बस सेवा, चालू करा वंचित बहुजन आघाडीची मागणी
—- आगार व्यवस्थापक श्री जूनैदी साहेब यांना निवेदन*


अक्कलकोट (प्रतिनिधि)-गेले दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला अक्कलकोट ते कंटेहळली या गावी बस सेवा बंद आहे त्यामुळे तेथील गावकऱ्यांना अनेक अडचणींना संकटांना सामोरे जावे लागत आहे . अनेक वयोवृद्ध महिला व पुरुष यांना अक्कलकोट शहर देण्यास अनेक त्रास होत असून प्रसूती महिला आपल्या रुटीन चेकअप साठी टमटम किंवा मोटरसायकल यावं लागतं त्यामुळे त्यांच्या आरोग्यास विपरीत परिणाम होत आहेत तसेच शालेय विद्यार्थी रोज पायी चालत जाणे आणि चालत येणे असे शाळेला येत असतात वेळेवर शाळेला पोचू शकत नाहीत महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनाही वेळेवर आपल्या महाविद्यालयात पोहोचता येत नाही असे एक ना अनेक अडचणीला कंटेहळली हा गाव समोर जात असून लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी अशा प्रकारची मागणी वंचित बहुजन आघाडी शाखा कंटे हळी यांच्यावतीने आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडी खांबे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट आगार व्यवस्थापक श्री जुनेद साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आठ दिवसात जर बस सेवा सुरु नाही झाला तर वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट शहर व तालुका च्या वतीने कंटेहळी ग्रामस्थांना घेऊन तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शिलामणी बनसोडे युवक आघाडी शहराध्यक्ष संदीप बाळ शंकर शहराध्यक्ष विशाल ठोंबरे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे तालुकाध्यक्ष रवी पोटे कंटे ह ळी शाखा अध्यक्ष सैपन ताची महा सचिव, यशपाल शिंदे, सचिव लक्ष्मण शिंगे आदी जण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button