जेऊरचे ग्रामदैवत श्री काशिविश्वेश्वर यात्रा हर्ष आणि उल्हासात संपन्न
श्री बसवेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जेऊरच्या वतीने १५ व्या वर्षी रक्तादान शिबिर आयोजन केले होते ह्या वेळी १२१ रक्तदात्यानी रक्तदान करून सहभाग नोंदवला

जेऊरचे ग्रामदैवत श्री काशिविश्वेश्वर यात्रा हर्ष आणि उल्हासात संपन्न

जेऊर ता.अक्कलकोट येथील ग्रामदैवत श्री काशिविश्वेश्वरचा रथोत्सव सोहळा शनिवारी रात्री आकर्षक हाराफुलांनी आणि रंगीबेरंगी विजेच्या लखलखाटानी सजविलेला रथाच्या मिरवणुकीचा मनमोहक सोहळा संपन्न झाला. मागील चार वर्षात पहिल्यांदाच भाविकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असणाऱ्या या सोहळ्याला विविध धार्मिक परंपरेचा मानाला विशेष महत्व असल्याने मोठ्या थाटात यात्रा पार पडली.काशीविश्वेश्वर महाराज की जय या घोषणेने रथोत्सव सोहळा परिसर दुमदुमला.

.रथोत्सव निमित्ताने श्री बसवेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, जेऊरच्या वतीने १५ व्या वर्षी रक्तादान शिबिर आयोजन केले होते ह्या वेळी १२१ रक्तदात्यानी रक्तदान करून सहभाग नोंदवला. जेऊर गावचे वाहन चालक व मालक संघटना कडून येणाऱ्या सर्वभावीकांचे मोफत सेवा केले.श्री गणेश सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,गावातील तरुण मंडळे, देवस्थान यात्रा पंच समिती,विविध सामाजिक संस्था,वैयक्तिकरित्या सुद्धा सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.नंतर रात्री ८ वाजता सर्व धार्मिक विधिविधानांने लहान उचाई,नंदिकोल, विविध कलाप्रकार यातून महारथोत्सव संपन्न झाले.नंतर सोलापूर चे प्रसिद्ध दारुकामचे उत्पादक श्री वळसंगकर यांच्या व श्री काशीविश्वेश्वर यात्रा पंचकमिटी यांच्या वतीने विविध प्रकारचे नयनमनोहर दारूकाम संपन्न झाले.रात्री ११वाजता देवस्थान समोर गोंधळी नाटक व श्री शंकरलिंग नुतन नाट्य संघ,जेऊर यांच्या वतीने कन्नड सुंदर कौटुंबिक, सामाजिक नाटक ” देवरू कोट्टू मग” प्रथम प्रयोग संपन्न झाले.

