ज्येष्ठांनी उर्वरित आयुष्य समाजात एकरूप होऊन घालवावे….. बसवराज पाटील
जिल्हा परिषद प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा ६१ वर्षानंतर स्नेह मेळावा उत्साहात

ज्येष्ठांनी उर्वरित आयुष्य समाजात एकरूप होऊन घालवावे….. बसवराज पाटील

जिल्हा परिषद प्रशालेतील माजी विद्यार्थ्यांचा ६१ वर्षानंतर स्नेह मेळावा उत्साहात

येथील शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात काम करून सेवानिवृत्त झाल्यानंतर देखील उत्कृष्ट जीवन जगत आहेत. अनेकांनी आपापल्या क्षेत्रात कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. आम्ही जीवनात यशस्वी झालो ते शाळेच्या संस्कारामुळेच. म्हणूनच जगात सर्वोत्कृष्ट संस्कृती म्हणून भारतीय संस्कृतीकडे पाहिले जाते. हीच विचारधारा आपण सर्वांनी जोपासून आयुष्य सुखकर व समाधानकारक घालविण्यासाठी ज्येष्ठांनी उर्वरित आयुष्य समाजात एकरूप होऊन घालवावे असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी केले. मुरुमच्या जिल्हा परिषद प्रशालेतील १९६१ बँचचे माजी विद्यार्थी ६१ वर्षांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद प्रशालेत रविवारी (ता. १९) रोजी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर मंमाळे होते. मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते. प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होता. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो, हे विसरून गेले होते. प्रारंभी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी कवायत करून बसवराज पाटील यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी रामकिशन मालपाणी, विनायक माने, किशन खंडागळे, आत्माराम शिंदे यांनी विद्यालय व गुरुवर्यांविषयी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोप प्रसंगी मधुकर मंमाळे यांनी प्रशालेची सध्यस्थिती सांगून प्रशालेची यशस्वीरित्या वाटचाल चालू असल्याचा लेखाजोखा मांडला.


डॉ. राधाकिशन डागा, पद्माकर हराळकर, विनायक माने, किसन खंडागळे, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ. नितीन डागा, डॉ. महेश मोटे, अँड. उदय वैद्य, निर्मला परीट, रुपचंद ख्याडे आदींनी पुढाकार घेऊन हा मेळावा यशस्वी केला. शरद वैद्य, विलास कुलकर्णी, बाबू चव्हाण, बाबू शिंदे, विठ्ठल घोडके, शिवप्पा ख्याडे, सायबण्णा ख्याडे, नरसिंग कांबळे, चंद्रकांत शिंदे, अँड. मारुती घोरपडे, भगवानदास झंवर, जानिमिया जमादार, सुग्रीव क्षीरसागर, राम धुमूरे, सुधाकर सुतार, मोतीराम बुवा, गिरमल चिलोबा, श्रीमंत मदने, मारुती कारंडे आदींनी विविध क्षेत्रात काम करुन सेवानिवृत्तीनंतरचे जीवन यशस्वीरित्या जगत असल्याचा स्वतःचा परिचय व त्यावेळी शिक्षण घेत असतानाच्या विद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा देऊन विद्यालय व शिक्षकांप्रती भावस्पर्शी भावना व्यक्त केल्या.

याप्रसंगी भगवानदास झंवर यांनी या प्रशालेच्या कार्यालयीन कामकाजासाठी कपाटाची आवश्यकता असल्याची जाणीव झाल्याने त्यांनी ऑफिस कपाट प्रशालेला भेट म्हणून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राधाकिशन डागा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहशिक्षक शिवाजी कवाळे तर आभार किसन खंडागळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने जेष्ठ माजी विद्यार्थी उपस्थित होते. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याप्रसंगी बसवराज पाटील, मधुकर मंमाळे, पद्माकर हराळकर, रामकिशन मालपाणी, डॉ. राधाकिशन डागा, श्रीमंत मदने, विनायक माने व अन्य माजी जेष्ठ विद्यार्थी.