गावगाथा

Navindagi : नाविंदगी ग्रामदैवत श्री प्रभुलिंगेश्वर यात्रेस कालपासून प्रारंभ ; अशी आहे पाच दिवसांच्या उत्सवाची रुपरेषा

Navindagi | akkalkot

HTML img Tag Simply Easy Learning    

नाविंदगी प्रतिनिधी – ( दयानंद गौडगांव) दि. ८ , अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथे श्री प्रभुलिंगेश्वर यात्रेस कालपासून प्रारंभ झाला आहे. काल पहाटे ५ वाजता ग्रामदैवत श्री प्रभुलिंगेश्वर यांच्या मुर्तीला रूद्राभिषेक करून यात्रेला सुरूवात करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

दरवर्षी गुढीपाडव्याला हा उत्सव मोठ्या उत्साहाने केला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणांहून गुढीपाडव्याला भक्तगण मोठ्या प्रमाणात श्री प्रभुलिंगेश्वरांच्या दर्शनासाठी येत असतात. (‘गावगाथा’ या दिवाळी अंकात गावाचा संपूर्ण इतिहास लिहिलेले आहे.) रथोत्सव आणि सामाजिक कौटुंबिक कन्नड नाटक या यात्रेचा प्रमुख आकर्षण मानला जातो.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमांची रुपरेषा खालील प्रमाणे:

HTML img Tag Simply Easy Learning    

सोमवार (दि.८) रोजी पहाटे ५ वाजता श्री प्रभुंचा रुद्राभिषेक सोहळा

मंगळवार (दि.९) रोजी पहाटे ५ वाजता श्री प्रभुलिंगेश्वरांना तैलाभिषेक , महारुद्राभिषेक , बिल्वार्चन आणि अलंकार सोहळा. सायंकाळी ४ वाजता नाविंदगी मठाचे मठाधिपती श्री शिवयोगी शिवाचार्य महाराज यांच्या सानिध्यात पंचाग पठण आणि श्रवण कार्यक्रम, तसेच संध्याकाळी ७ वाजता श्रींच्या पालखी आणि नंदी ध्वज मिरवणूक. यानंतर रात्री ठिक १० वाजता पारंपरिक कौटुंबिक कन्नड नाटकाचा ( अत्तीगीगे बंद अग्नीपरिक्षे ) आस्वाद घेता येणार आहे.

बुधवार (दि. १०) रोजी श्रींना रुद्राभिषेक यानंतर सकाळी १० वाजल्यापासून पारंपरिक कन्नड भावगीत आणि भजन गितांचा आस्वाद घेता येणार आहे.

यानंतर बुधवार (दि.१०) सकाळी १० वाजल्यापासून सायं ४ वाजेपर्यंत श्री प्रभुलिंगेश्वर संस्कृतीक भवानात ‘भव्य रक्तदान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे.

सायंकाळी ६ वाजल्यापासून श्री प्रभुलिंगेश्वर यांच्या भव्यदिव्य ‘रथोत्सव’ कार्यक्रम पाहता येणार आहे.

गुरूवार (दि. ११) पहाटे ५ वाजता महारुद्राभिषेक आणि सायंकाळी ४ वा. प्रसिद्ध पैलवानांचा आखाड्यात कुस्ती रंगणार आहे. नंतर महाप्रसादाचा आस्वाद घेता येणार आहे.

त्यानंतर रात्री ९ वाजता पुन्हा कन्नड कौटुंबिक नाटकाचा ( प्रयोग -२) पाहता येणार आहे‌.

शुक्रवार (दि.१२) ठिक रात्री ८ वाजता कलश उतरविण्याचा कार्यक्रम असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button