गावगाथा

पंढरीतील पांडुरंग हृदय तर अक्कलकोटचे स्वामी हे भाविकांची आत्मा – ह.भ.प. औसेकर महाराज

वटवृक्ष मंदिर कार्यालयात ह.भ.प.औसेकर महाराजांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

पंढरीतील पांडुरंग हृदय तर अक्कलकोटचे स्वामी हे भाविकांची आत्मा – ह.भ.प. औसेकर महाराज

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट (श्रीशैल गवंडी) दि.७/२/२४ – पंढरपूर हे महाराष्ट्राचे हृदय असून या ठिकाणी प्रकट झालेला समतेचा विचार महाराष्ट्र सह देशभर प्रवाहित झाला आहे. पंढरपूर प्रमाणे अक्कलकोट देखील श्री स्वामी समर्थांचे तीर्थक्षेत्र हे समतेचे केंद्र आहे. पंढरपूर आणि अक्कलकोट ही दोन्ही केंद्रे भक्तीचे संगम साधून अध्यात्माच्या माध्यमातून हिंदू धर्माचे महात्म्य वर्णन करीत आहेत. त्यामुळे पंढरीतील पांडुरंग हे भाविकांचे हृदय तर अक्कलकोटचे स्वामी हे भाविकांची आत्मा असल्याचे मनोगत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे मनोभावे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला व महाराजांचे आशिर्वाद घेतले. याप्रसंगी गहिनीनाथ महाराज औसेकर बोलत होते. पुढे बोलताना ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी वारकरी सांप्रदाय, दत्त सांप्रदाय, नाथ सांप्रदाय या सर्व हिंदू धर्मातील विविध आध्यात्माचे बिंदू आहेत. या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भाविकांचा पंढरपूरकडे कल असतो, तर दत्त सांप्रदायातील भाविकांचा अक्कलकोट येथील स्वामी दर्शनाकडे कल असतो. किंबहुना दोन्हीही देवांचे दर्शन घेऊन धन्यता भावते, त्यामुळे ही दोन्ही पवित्र तिर्थक्षेत्रे धर्म आणि मानवी जीवन संस्कार जडणघडणाची केंद्रे आहेत असेही मनोगत गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले, आणि येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराचे व्यवस्थापन पाहून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांचे विशेष आभार मानले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, मारुती बावडे, आबा महाराज, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, ऋषिकेश लोणारी, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, समर्थ घाटगे, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – वटवृक्ष मंदिर कार्यालयात ह.भ.प.औसेकर महाराजांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button