*करजगी गावच्या चौफेवर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्रामस्थांनी सुचवलेल्या प्रत्येक अडचण सोडण्यास मी कटिबद्ध ; आमदार सचिन कल्याणशेट्टी*
तालुक्यातील नवनिर्वाचित अठरा गावच्या सरपंचासह सर्व सदस्य बाजार समिती सभापती विकास सेवा सोसायटी चेअरमन यांचे भव्य नागरी सत्कार सह विविध विकास कामाचे शुभारंभ करण्यात आले
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231202-WA0075-780x470.jpg)
*करजगी गावच्या चौफेवर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्रामस्थांनी सुचवलेल्या प्रत्येक अडचण सोडण्यास मी कटिबद्ध ; आमदार सचिन कल्याणशेट्टी*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*करजगी गावच्या चौफेवर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ग्रामस्थांनी सुचवलेल्या प्रत्येक अडचण सोडण्यास मी कटिबद्ध असून माझ्या वर विश्वास ठेवून प्रचंड मतांनी विजयी केलात असेच प्रेम आशीर्वाद त्यांच्या पाठीशी अखंडपणे ठेवण्याचे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
ते करजगी ता.अक्कलकोट येथे तालुक्यातील नवनिर्वाचित अठरा गावच्या सरपंचासह सर्व सदस्य बाजार समिती सभापती विकास सेवा सोसायटी चेअरमन यांचे भव्य नागरी सत्कार सह विविध विकास कामाचे शुभारंभ करण्यात आले यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ जय सिद्धेश्वर महास्वामीजी म नि प्र शिवानंद महास्वामीजी करजगी आमदार सचिन कल्याणशेट्टी स्वामी समर्थ साखर कारखान्याचे चेअरमन संजीवकुमार पाटील व्हाईस चेअरमन आप्पासाहेब पाटील शिवानंद पाटील भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड शहर अध्यक्ष शिवशरण जोजन परमेश्वर यादवाड मल्लिनाथ स्वामी शिवसिद्ध बुळा अशोक हिप्परगी प्रकाश हिप्परगी सुरेश सारणे महेश हिंदोळे श्रीशैल घीवारे आधी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
पुढे बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले करजगी गावच्या यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. ग्रामस्थांनी गुड्ड्द बसवराज ग्राम विकास पॅनलचे सर्वेसर्वा उंबरजे बंधू वर विश्वास ठेवून प्रचंड मताने विजयी केलात या विश्वासाला पात्र राहून अत्यंत पारदर्शकपणे कारभार करतील या शंकाच नाही पण तुम्ही ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे सदैव उभे राहावे असे आव्हान करून करजगी गावच्या चौफेरी विकासासाठी मी कटिबद्ध असून आपण सुचवलेल्या कामाला निधी कमी पडू देणार नाही असे सांगून अक्कलकोट ते करजगी करजगी ते सुलेर जवळगे व अक्कलकोट ते तडवळ दूतर्फा रस्त्याचे काम ही लवकरात लवकर मार्गी लावणार असल्याचे कल्याणशेट्टी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना खासदार डॉ जय सिद्धेश्वर महास्वामीजी म्हणाले ग्रामस्थांना सत्कार सन्मानपेक्षा आमदार खासदारांच्या निधीतून विकास काम महत्त्वाचे असून राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या दातृत्वाने तालुक्यातील प्रत्येक गावात विकास गंगा पोहोचलेला आहे आगामी काळात आणखी निधी लागल्यास कमी पडू देणार नसल्याचे खासदार डॉ जय सिद्धेश्वर महास्वामीजी बोलत होते.
यावेळी नगरसेवक महेश शिंदोळे माजी जि प सदस्य शिवानंद पाटील भाजपा माजी तालुका अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले उंबरजय बंधू सामाजिक शैक्षणिक बरोबर राजकारणात प्रवेश केलेला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून संघर्ष करणाऱ्या उंबरजें बंदुवर यंदा ग्रामस्थांनी विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला पात्र राहून ते कारभार करतील या शंका नाही परंतु त्यांच्या पाठीशी ग्रामस्थांनी सदैव उभे राहावे असे आव्हान प्रसंगी केले.
*चौकट :*
गेल्या पंचवीस वर्षापासून शिवानंद महास्वामीजी आणि आमच्या परिवाराचे काही किरकोळ वैचारिक मतभेद होते ते ते यंदा दूर झाले असून आता आमचे मनोमिलन झालेले आहे आमचे मतभेद झाले असले तरी त्यांच्यावरील आस्था व प्रेम कमी झालेले नव्हते आणि भविष्यात होणारी नाही मार्गक्रमण करणार असून आमदार सचिन कल्याण शेट्टी व खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी भरघोस निधी गावच्या विकासासाठी दिलेला आहे यामुळे खरेदी गावचे वीस वर्षाचे खुंटलेला विकास काम पूर्ण होईल असे मत प्रास्ताविकेत कार्यक्रमाचे संयोजक अड दयानंद उंबरजे बोलत होते.
याप्रसंगी रामन्ना अर्वात बाबुराव पाटील सुरेश अर्जुने सुरेश झळकी निलापा शिवमुर्ती कामगोंडा बाकी मल्लिकार्जुन कारले गुरुपाद मलकप्पा इंडी एरंडा गुब्बेड महादेव महाजन निंगाप्पा कलशेट्टी महबूब मुल्ला गुरुपुत्र गंगदे पिंटू पाटील स्वामीनाथ चौगुले मल्लिनाथ डबे मल्लिकार्जुन डबे ज्योती उन्नद चंद्रकला कार्यमुंगी अरविंद भडोळे आदी सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यात नुकतेच पार पडलेल्या 18 ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच सदस्य व दुधनी व अक्कलकोट बाजार समितीचे सभापती व सर्व संचालक विकास सेवा सोसायटी चेअरमन सह प्रशासित कर्मचाऱ्यांचे सत्कार व सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पवार तर आभार करजगीचे नूतन सरपंच विवेकानंद उंबरजे यांनी मानले कार्यक्रमाची सुरुवात श्री गुद्दद बसवराज महास्वामीजी यांच्या प्रतिमापूजन प्रदीप प्रजलांनी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.