अक्कलकोट येथील कुंभार गल्लीतील कार्तिक मास निमित्ताने दिपोत्सव साजरा
तब्बल पाच हजार पणत्यांच्या दिव्यांची आरास मठात करण्यात आली होती. कार्तिक मास निमित्ताने शांतलिंगेश्वर हिरेमठात यंदाच्या पहिल्या वर्षी दिपोत्सव साजरा करण्यात आल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231202-WA0065-780x470.jpg)
अक्कलकोट येथील कुंभार गल्लीतील कार्तिक मास निमित्ताने दिपोत्सव साजरा
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
येथील कुंभार गल्लीतील श्रीशैल पीठाचे श्री शांतलिंगेश्वर हिरेमठात मठाधिपती श्री. ष. ब्र. जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात
कार्तिक मास निमित्ताने शुक्रवारी रात्री
दिपोत्सव साजरा करण्यात आला. तब्बल पाच हजार पणत्यांच्या दिव्यांची आरास मठात करण्यात आली होती. कार्तिक मास निमित्ताने शांतलिंगेश्वर हिरेमठात यंदाच्या पहिल्या वर्षी दिपोत्सव साजरा करण्यात आल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
पाच हजार दिव्यांची आरास आणि रांगोळीच्या पायघड्यामुळे हिरेमठ परिसर उजळून गेला. यावेळी उपस्थित भाविकांचे मन प्रफुल्लित झाले होते.हिरेमठ हे तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरातील प्राचीन मठ आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या या शांतलिंगेश्वर मठात सतत भक्तांची वर्दळ असते. दिवाळीनंतर होणाऱ्या या कार्तिक मासात सर्वांचाच उत्साह ओसंडून वाहत आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली दिव्यांची आरास भक्तांसाठी आकर्षण ठरले आहे. मठात ठिकठिकाणी मोठ्या आकाराची भव्य रांगोळी काढण्यात आली होती. त्या रांगोळीवर रात्री पाच हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच हिरेमठातील बालशिवयोगी श्री गुरुशांतलिंग महास्वामीजींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
महामंगलारतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले. सुमारे दोन तासभर चाललेल्या दिपोत्सव सोहळा वेदमूर्ती बसवराज शास्त्री व संगय्या शास्त्री यांच्या वैदिकत्वात पार पडला. शेवटी सर्व भाविकांना महानिंग सोमेश्वर परिवाराच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
या सोहळ्यास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे प्रथमेश इंगळे, शिवनिंगय्या स्वामी, ओंकार ग्रामोपाध्ये, नागराज कुंभार, भिमाशंकर कुंभार, सुर्यकांत बिराजदार, भिमाशंकर करकी, कल्याणप्पा बिराजदार, बाबुराव बिराजदार, तात्यासाहेब समाने, शिवय्या स्वामी, मल्लिनाथ माळी, रामचंद्र कडबगांवकर, विजयकुमार हौदे, अनिल हत्ते, शरणप्पा कुंभार, शिवानंद कुंभार, चिदानंद कुंभार, काशिनाथ याळवार आदि शेकडो भाविक उपस्थित होते. विशेष म्हणजे यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.
चौकट —
कार्तिक मासचे औचित्य साधून मठाच्या पटांगणात दीपोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीमध्ये कार्तिक महिन्यातील या दीपोत्सवात प्रज्वलित केले जाणारे दिवे हे मांगल्याचे प्रतीक मानले जातात. यामुळे दुष्ट शक्ती पळून जातात, अशी धारणा आहे.
– श्री. जयगुरुशांतलिंगराध्य महास्वामीजी,
मठाधिपती.