गावगाथा

हंजगी ग्रामपंचायतीच्या वतीने विना परवाना व अनाधिकृत अतिक्रमण करुन घर बांधकाम करणाऱ्याला दणका.

घराचा अतिक्रमण केलेला भाग पोकलेन मशिनद्वारे केला जमिनदोस्त./गावपातळीवरील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले.

हंजगी ग्रामपंचायतीच्या वतीने विना परवाना व अनाधिकृत अतिक्रमण करुन घर बांधकाम करणाऱ्याला दणका./ घराचा अतिक्रमण केलेला भाग पोकलेन मशिनद्वारे केला जमिनदोस्त./गावपातळीवरील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

हंजगी,

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील गावाच्या मुख्य वेशीतील प्रवेशद्वारावरच हमीदा नबीलाल मुल्ला यांनी विना परवाना व अनाधिकृत अतिक्रमण करुन घर बांधत असल्याचे तक्रार गेल्या दीड वर्षांपासून गावपातळीवर सुरु होती.या तक्रारीवरून सरपंच,उपसरपंच,सदस्य, गावातील तंटामुक्त अध्यक्ष व गाव पंचांनी मिळून गावाचा मुख्य प्रवेशद्वार असल्याने याठिकाणी गावचा वेश बांधण्यात येणार आहे,तरी तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण करुन घरचे बांधकाम करु नका,रीतसर मोजमाप करुन तुमच्या जागेवरच बांधकाम करा असे अनेक वेळा सांगून ही हमीदा नबीलालां मुल्ला यांनी न ऐकता रितसर तुम्हाला काय कारवाई करायचे आहे ते तुम्ही करा आम्ही याच जागेवर बांधकाम करणार म्हणून ग्रामपंचायतीच्या हद्दीत अतिक्रमण करून आरसीसी दुमजली पक्की इमारत बांधण्यात आली होती.त्यानंतर गावपातळीवर या अतिक्रमणा विषयी अनेक वेळा चर्चा करुन विषय मिटविण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ग्रामपंचायत व अतिक्रमणधारकात एकमत न झाल्याने विषय वाढत गेला.शेवटी ग्रामपंचायत सरपंच,सदस्य आणि गाव तंटामुक्त अध्यक्ष व प्रतिष्ठित गावकरी मिळून रीतसर कारवाई करण्याचे मार्ग स्वीकारले.संबंधित अक्कलकोट पंचायत समितीचे बीडीओ सचिन खुडे यांच्याकडे सर्व कागदोपत्रासह पुरावा सादर करुन ग्रामपंचायत हद्दीत कशाप्रकारे विना परवाना व अनाधिकृत अतिक्रमण करुन बांधकाम झाले आहे याची नक्कल जोडून समक्ष पंचनामा करण्याची मागणी केली होती.तेव्हा अक्कलकोट पंचायत समितीचे संबंधित बीडीओ सचिन खुडे यांनी सदर पंचनामा करण्यासाठी पंचायत समिती चे विस्तारधिकारी पी एल कोळी यांची नियुक्ती केली होती.विस्तारधिकारी पी एल कोळी यांनी समक्ष गावपातळीवर जाऊन विना परवाना व अनाधिकृत अतिक्रमण बांधकामाचा पंचनामा करुन पंचायत समिती बीडीओ यांना अहवाल सादर करताच अतिक्रमण धारकांनी कायदेशीर लढा देण्यासाठी अक्कलकोट येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती.पुढे तालुका व जिल्हा या दोन्ही न्यायालयाकडून ग्रामपंचायतीच्या वतीने निकाला दिला असताना ही अतिक्रमण धारकांकडून पुढे हायकोर्टात याचिका दाखल करून दाद मागण्याचा प्रयत्न केला गेला होता.पुढे हायकोर्ट देखील तालुका व जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम ठेवत दि 31 ऑगस्ट 2023 रोजी मुंबई येथील उच्च न्यायालयात अमित बोरकर या न्यायाधीशापुढे निकाल होऊन दि 1 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामपंचायतीच्या वतीने निकाल दिला आहे.या निकाला मुळे ग्रामपंचायत हद्दीत विनापरवान व अतिक्रमण करुन घर बांधकाम करणाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.अखेर आज हायकोर्टाच्या आदेशानुसार व अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली 17 जणांची पोलीस टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यरथ ठेवून चोख बंदोबस्तात हंजगी येथील हमीदा नबीलाल मुल्ला यांनी भरवेशीत विनापरवांना व अतिक्रमण करुन दुमजली आरसीसी बांधकाम केलेल्या घरावर पोकलेन मशिनद्वारे कारवाई करण्यात आली आहे.या कारवाई मुळे ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करुन घर बांधकाम करणाऱ्यांची धाबे मात्र दणाणले आहेत.हंजगी ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या या धाडसी निर्णयाचे संपूर्ण तालुक्यातून चर्चा होत आहे.या कारवाईमुळे गावात अतिक्रमण करुन घर बांधकाम करणाऱ्यामध्ये सध्या धाकधूक वाढताना दिसते.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट

 

सचिन खुडे बीडीओ पंचायत समिती अक्कलकोट.

 

चौकट

अतिक्रमण धारकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने दि 1 सप्टेंबर 2023 रोजी हायकोर्टाने निकाल दिला आहे.आज न्यायालयाच्या या आदेशानुसारच कारवाई करण्यात आली आहे.–

अभय नेलुरे ग्रामसेवक हंजगी.

 

चौकट

गावपातळीवरील विषयी गावातच मिटविण्यासाठी बराच प्रयत्न केला गेला.याला अतिक्रमण धारकांकडून कधीच प्रतिसाद मिळाला नाही.बहुसंख्य गावकरी समजून सांगितले असताना ही अतिक्रमणधारकावर याचा काहीच परिणाम झाला नाही.शेवटी ना-ईलाजाने रीतसर कारवाई करावी लागली.—-

भाग्यश्री हालोळे सरपंच हंजगी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button