साने गुरुजी जयंतीनिमित्त हंजगी आश्रम शाळेला पुस्तके भेट
हंजगी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 'श्यामची आई' पुस्तक भेट देताना
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231203-WA0016-780x470.jpg)
साने गुरुजी जयंतीनिमित्त हंजगी आश्रम शाळेला पुस्तके भेट
——-
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
हंजगी,दि-
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी येथील वाल्मिकी बालक प्राथमिक आश्रम शाळेत साने गुरुजीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून श्यामची आई अशी ५१ पुस्तके विद्यार्थ्यांना भेट देण्यात आली. कारण ‘श्यामची आई’ या पुस्तकामुळे विद्यार्थ्यावर वाचन संस्कार होऊन व्यक्तीच्या समाज आणि राष्ट्र विकासाला चालना मिळण्यास मदत होत असते. म्हणून आनंददायी वाचनाला व संस्काराला प्रोत्साहन मिळावा यासाठी साने गुरुजी तालुका शाखेच्या वतीने श्यामची आई या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी तालुका शाखेचे प्रमुख परमेश्वर व्हसुरे, मुख्याध्यापक यशवंत पाटील आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिदानंद बाबा, शिवरुद्र लोकापुरे, सिध्दप्पा बिराजदार, मल्लप्पा होसुरे, चन्नबसप्पा तुकशेट्टी, गुरुनिंगय्या स्वामी, मोहन कुलकर्णी व राजशेखर चांगले, सिध्दगोंडा बिराजदार आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिदानंद बाबा तर आभार सिध्दगोंडा बिराजदार यांनी मानले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
फोटो ओळ
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
हंजगी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ‘श्यामची आई’ पुस्तक भेट देताना