मनसेचा घरगुती रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
कार्यक्रमप्रसंगी मनसेचे इतर सर्व पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

मनसेचा घरगुती रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ संपन्न

पूनम पाटगावे
जोगेश्वरी प्रतिनिधी

जोगेश्वरी :- मनसे ने जोगेश्वरी-पूर्व विधानसभा प्र.क्र.७३ मध्ये रविवार दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत घेतलेल्या घरघुती रांगोळी स्पर्धेत महिला-पुरुषांसह अनेक शाळकरी मुलांनीही सहभाग घेतला होता. मनसे तर्फे जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा प्रभाग. क्र.७३ मध्ये दिपावली निमित्त घेण्यात घेण्यात आलेल्या घरघुती रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा व इतर सर्व सहभागी स्पर्धकांचा सन्मान सोहळा शनिवार दि. ०२ डिसेंबर २०२३ रोजी शाखेत घेण्यात आला. पक्षाचे उपाध्यक्ष प्रविणजी मर्गज, विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व स्पर्धकांना सन्मान पत्र व भेटवस्तू देण्यात आल्या. पहिले तीन स्पर्धक व उत्तेजनार्थ दोन स्पर्धक परिक्षकांकडुन निवडुन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी शाखाअध्यक्ष रमाकांत नर यांनी सर्वच रांगोळी स्पर्धकांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमप्रसंगी मनसेचे इतर सर्व पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.
