गावगाथा

*IMPACT राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागे दोन दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध होताच रस्त्याच्या डागडुजीला सुरवात*

*येत्या आठवड्याभरात पेविंग चे पण काम पूर्ण होणार*

*IMPACT राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागे दोन दिवसापूर्वी बातमी प्रसिद्ध होताच रस्त्याच्या डागडुजीला सुरवात*

HTML img Tag Simply Easy Learning    

*येत्या आठवड्याभरात पेविंग चे पण काम पूर्ण होणार*

HTML img Tag Simply Easy Learning    

✒️ *प्रविणकुमार बाबर /सांगवी बु*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट दि :- 03 तालुक्यातील वागदरी रस्त्यावर डांबर उखडून खड्डे पडल्याने वाहनचालकांना यांचा नाहक त्रास होत होता याच विषयाला धरून दैनिकांत बातमी प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग विभाग खडबडून जागे झाले व तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली असून,विशेष धक्कदायक बाबा म्हणजे सांगवी बु येथील पुलाच्या दुभाजकाला भला मोठा भगदाड पडला असून, हा पूल संपताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला भले मोठे खड्डे पडलेले लांबून वाहन चालकाच्या निदर्शनास येत नाहीत पण गाडी जवळ जाताच हे खड्डे दिसतात अचानक पणे गाडी कंट्रोल करणे हे वाहन चालकांना धोक्याचे ठरत असून, दोन दिवसापूर्वी दुचाकीस्वार ला हा खडा न दिसल्याने गाडी खड्ड्यात गेली व हे दोघे पडले आणि त्यामध्ये निमगाव येथील रहिवासी बियामा चांद शेख वय -53 ह्या गंभीर झाले होते पण दोन दिवसाच्या उपचारा दरम्यान त्या जखमी महिलेचे काल निधन झाले.

HTML img Tag Simply Easy Learning    


अक्कलकोट वागदरी हा रस्ता सा बा विभागाच्या आखतरीत होता पण गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्याकडे हस्तातरीत करण्यात आला आहे. या विभागाच्या ठेकेदार व अधिकाऱ्यानी या गंभीर बाबीकडे डोळेझाक करीत होते. पण दोन दिवसापासून सतत बातम्या झळकल्या आणि महामार्ग खाते तात्काळ कामाला लागले. व येत्या आठवड्याभरात (पेवर ) पेविंग चे पण काम पूर्ण होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी यांनी दिली
अक्कलकोट वागदरी राष्ट्रीय राज्य महामार्ग हा रस्ता कर्नाटक व मराठावाडा यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा रस्ता समजला जातं असून या रस्त्यावर सर्वात जास्त रहदारी असते. या सांगवी बु पुलाजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्यात आत्तपर्यंत 30 ते 40 जण पडून गंभीर जखमी झाल्याची घडली आहे.त्यातच एका महिलेचे मृत्यू झाले आहे.
—————————————-
चौकट :- अक्कलकोट वागदरी ह्या रस्त्याच्या टेंडरला सेंटर मधून लवकर परवानगी न मिळाल्याने कामाला उशीर झाला आहे. आता सध्या खड्डे बुजवण्याचे काम चालू असून, येत्या आठवड्यात भरात पेविंग सह रस्त्याचे काम पूर्ण होईल.

➡️ किरण हबीब, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button