*चपळगाव प्रशालेची सहल उत्साहात संपन्न!*
सिंहगड ,पवना लेक, लोणावळा ,माथेरान, एलिफंटा लेणी व समग्र मुंबई दर्शन याठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली.

*चपळगाव प्रशालेची सहल उत्साहात संपन्न!*


अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालय या शाळेची सहल सिंहगड ,पवना लेक, लोणावळा ,माथेरान, एलिफंटा लेणी व समग्र मुंबई दर्शन याठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली.
गुरुवार दि.३० नोव्हेंबर ते शनिवार दि.२ डिसेंबर २०२३ या तीन दिवसात ४६ मुली ४४ मुले ९ शिक्षकांच्या मार्गदर्शनरुपी सहवासात तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे दर्शन, छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, विशाल अशा इतिहासाचे साक्षीदार असलेला सिंहगड किल्ला विद्यार्थ्यांनी इतिहासात जाऊन अनुभवला .पवना डॅमवरील विद्युत निर्मिती केंद्र वैज्ञानिक दृष्टिकोनात विद्यार्थ्यांनी अभ्यासले. समुद्रसपाटीपासून साधारण २६२५ उंचीवर असलेल्या, प्रदूषण विरहित” माथेरान ” या निसर्गाने नटलेल्या स्थळाचा आस्वाद लुटला. तसेच लोणावळाचा परिसर, एलिफंटा लेणी,मुंबई ,मुंबईतील गेट ऑफ इंडिया,ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल , मरीन ड्राइव्ह,सी लिंक, बांद्रा परिसर अत्याधुनिक पध्दतीने बनवलेल्या ठिकाणांचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.सहलीचा आनंद अतिशय उत्साहात अनुभवला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अक्कलकोट आगारातील दोन बसचे चालक सुरवसे व स्वामी यांच्या काळजीपूर्वक सुरक्षित व यशस्वीपणे सहलीचा प्रवास पार पाडले.इतिहास, भूगोल व विज्ञान यासह सर्व विषयांचा अभ्यास व अनुभव सहलीतून मिळतो,असे मत संस्था अध्यक्ष श्री. रविकांत पाटील साहेब यांनी व्यक्त केले.

सहल यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री प्रभाकर हंजगे सर,कार्याध्यक्ष पंडित पाटील व सर्व पदाधिकारी, प्राचार्य मूली सर, पर्यवेक्षक माने सर, संस्था सीईओ एन.एम. पाटील सर यांनी आनंद व्यक्त केला.
सहल यशस्वी करण्यासाठी माजी सहल प्रमुख श्रीगिरी सर,सहल प्रमुख नारायणकर सर, उपप्रमुख एम.एस.पाटील सर,थ्वंटे सर व सर्व गुरूजन वर्ग यांचे सहकार्य लाभले.
