*पालकमंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महादेव कोगनुरे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून “उद्योजकता” पुरस्कार*
प्रशासकीय,अधिकारी, उद्योजक , पत्रकार व छायाचित्रकार या विविधक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्वांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

*पालकमंत्री मा.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महादेव कोगनुरे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून “उद्योजकता” पुरस्कार*

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक तथा एम के फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्योजकता पुरस्कार देण्यात आला.

समाजातील उपेक्षितांचे व वंचितांचे जीवनमान उंचविण्याचे उत्कृष्ट कार्य करत असुन महादेव कोगनुरे यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी प्रशासकीय,अधिकारी, उद्योजक , पत्रकार व छायाचित्रकार या विविधक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्वांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री चंद्रकांत दादा पाटील, अक्कलकोट तालुक्याचे आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, प्रदेश संघटक मराठी राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र श्री संजय जी भोकरे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, डॉ.वंशपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठा सुधीर देशमुख, बालाजी अमाईन्स चेअरमन राम रेड्डी, प्रेसिजनचे चेअरमन यतीन शहा, इंद्रधनुष्य गृह प्रकल्पचे गणेश कोळी, चव्हाण उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक शिवप्रकाश चव्हाण, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मनीष केत, अवताडे ग्रुपचे संजय अवताडे, ॲटलांस उद्योग समूहाचे सुबोध पुतडा पत्रकार श्रमिक संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, प्रमोद बोडके, आफताब शेख, सागर सुरवसे, मिलिंद राऊळ, दिनेश शिंदे, अहमद शेख, तसेच सागर सिमेंटचे अधिकारी आणि एम के फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
