PCMC suicide case: बापरे..! पिंपरी चिंचवड परिसरात एकाच दिवशी ७ जणांनी केला आत्महत्या ; कुणी गळफास घेऊन तर कुणी….
निगडी (प्रतिनिधी): पिपरी-चिंचवड शहर आणि आसपासच्या परिसरात एकाच दिवशी सात आत्महत्यांच्या घटनांची नोंद झाली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोमवारी दिवसभरात या घटना घडल्या असून, शहरातील वाढत्या आत्महत्येच्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत आहे.

गौरव ज्ञानेश्वर अगम (वय २८) या तरुणाने खिडकीतून भिंतीला आलेल्या लोखंडी ब्क्रेटला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. २७) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येच्या दुसर्या घटनेत प्रसाद संजय अवचट (वय ३१, रा. पुनावळे) या तरुणाने सोमवारी (दि. २७) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.


आत्महत्येच्या तिसर्या घटनेत विकास रामदास मुरगुंड (वय ३५) या व्यक्तीने गणपत लांडगे चाळ, भोसरी येथे साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. २७) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येच्या चौथ्या घटनेत मनाप्पा सोमल्या चव्हाण (वय ५२, रा. शिंदेवस्ती, नेरे, ता. मुळशी, जि. पुणे) या व्यक्तीने घरशेजारील लिंबाच्या झाडाला डोक्याच्या पटक्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. २७) सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.

आत्महत्येच्या पाचव्या घटनेत नवनाथ भगवान पवार (वय ४६, रा. पवार चाळ, दत्तनगर, थेरगाव) यांनी राहत्या घराच्या बेडरूममध्ये बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना सोमवारी (दि. २७) मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मात्र मृत्यूचे नेमके कारण समजू न शकल्याने त्यांचा व्हिसेरा प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे.

आत्महत्येच्या सहाव्या घटनेत सुवर्णा श्रीराम पवार (वय ३६, रा. समीरा हाईटस्, ढोरेनगर, जुनी सांगवी) या महिलेने राहत्या घरत छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घअना सोमवारी (दि. २७) रात्री ११.५४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
राहत्या घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून दिनेश सुरेश लोखंडे (वय ४०, रा. चिखली) या व्यक्तीने आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. २६) सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. चिखली पोलीस तपास करीत आहेत.