गावगाथा

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी

महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी

 सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली असून, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. आगामी निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेत सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने भाजपने आतापासूनच नियोजनबद्ध तयारीला सुरुवात केल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट होते.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना संघटन बांधणीचा मोठा अनुभव असून, जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांनी यापूर्वीही प्रभावी भूमिका बजावली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आढावा घेणे, इच्छुक उमेदवारांची चाचपणी, कार्यकर्त्यांचे संघटन, प्रचार यंत्रणेची आखणी आणि निवडणूक रणनीती तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेत भाजप सत्ता स्थापनेसाठी आक्रमक रणनीती राबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोलापूर महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात सोलापूरच्या राजकारणात हालचालींना वेग येणार असून, इतर पक्षांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button