दक्षिण सोलापूर तालुक्यात गुरुवारी भरला आठवडा बाजार
उद्या शेत शिवारात चांगभलं चा गजर होणार
पत्रकार दिनकर नारायणकर
सोलापुर: दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रूप ,वळसंग या गावी वेळा आमवस्या निमित्त आठवडी बाजार गुरुवारी भरवण्यात आला. वास्तविक प्रत्येक गावचा आठवडा बाजाराचा दिवस ठरलेला असतो जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यात बदल होत असतो.अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेळा अमावस्या हा शेतकऱ्यांचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो.त्यामुळे वेळा अमावस्येच्या आदल्या दिवशी भाजीपाल्याचा बाजार भरवला जातो. हा निर्णय गावातील प्रमुख मानकरी मंडळी,सरपंच,पाटील यांच्या संमतीने घेतला जातो.शुक्रवारी वेळामावस्या अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यानिमित्त शेतातील पांडव व लक्ष्मीची पूजा शेतकरी परिवार करतात. या दिवसात भाज्या मुबलक प्रमाणात मिळत असल्याने सर्व एकत्रित करून एकच भाजी बनवली जाते.सोबत बाजरीच्या भाकऱ्या,बाजरीचे उकडलेले उंडे, खीर किंवा पुरणपोळी व आंबील असा मस्त बेत असतो. शेतातील पिकांची चांगभलं ,खिचडी खिलाओ च्या गजरात पूजा केली जाते. त्यानंतर शेतकरी परिवार शेजारीपाजारी मित्रमंडळी यांना सोबत घेऊन शेतातच पंगत मांडतात.वेळा अमावस्येच्या दिवशी गावात अघोषित संचारबंदी असते. दुपारी दोन नंतर गावात कुणीही दिसत नाही सर्व रस्ते पाऊस पडतात.
पूर्वीच्या काळी शेतात पाणी मिळणे दुर्मिळ होते त्यामुळे रब्बी पिकाच्या पेरणीनंतर शेतकरी शेत जमिनीचे ऋण फेडण्यासाठी जमिनीची पूजा करून शेतीची व्यवस्था पांडव व लक्ष्मी यांच्याकडे सोबत असे.त्यानंतर थेट रब्बी पिकाच्या राशीसाठीच शेतकरी शेतात जात असत. दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात आजही हा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. शहरात राहणारे शेतकरीही तेवढ्याच उत्साहाने या पारंपारिक सणांमध्ये सामील होतात.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!