जे. ई. एस स्कूल च्या विद्यार्थ्यांनी गिरवला विज्ञानाचा धडा
विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे रोबोट. हा रोबोट जे. ई. एस. स्कूल नी स्व खर्चानी शाळकरी मुलांकरिता तीन दिवसासाठी बेंगलोर हुन मागवला आहे.

जे. ई. एस स्कूल च्या विद्यार्थ्यांनी गिरवला विज्ञानाचा धडा

पूनम पाटगावे


जोगेश्वरी :- शिक्षण निरीक्षक पश्चिम विभाग आणि माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा बृहन्मुंबई अंतर्गत के / पी पूर्व विभाग विज्ञान प्रदर्शन २०२३ – २०२४ चे आयोजन जोगेश्वरी पूर्व येथील जे. ई. एस. इंग्लिश स्कूल येथे दि. १२, १३ व १४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती कार्यवाह किरण कामात व मुख्याध्यापिका सौ. कविता सिंघी यांनी केली आहे. विज्ञान प्रदर्शन उदघाटन सोहळा दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या विज्ञान प्रदर्शनात १२४ शाळांचा सहभागी झाल्या आहेत. “समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” या विषयावर ७५ शाळांमधून विज्ञानधीष्ठित प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात ठेवले आहेत. या विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे रोबोट. हा रोबोट जे. ई. एस. स्कूल नी स्व खर्चानी शाळकरी मुलांकरिता तीन दिवसासाठी बेंगलोर हुन मागवला आहे.


हे रोबोट बघून शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. या विज्ञान प्रदर्शनात रोबोट, स्मार्ट फार्मिंग त्याचबरोबर उमेश राऊत यांच्या भारतीय बनावटीच्या विमानांची प्रत्यक्षिके ही खास असणार आहेत. सदर विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ड्रोन द्वारे पुष्पवृष्टीही करण्यात आली तसेच अखेरच्या दिवशी १४ डिसेंबर रोजी शाळेच्या पटांगणात सायंकाळी लेझर शो आयोजित केला आहे. सदर विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी शाळकरी मुलांसह त्यांचे पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.