विविध मागण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर
मुरुमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील कर्मचारी सहभागी झाले. यावेळी रितसर प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांना संपावर जाण्याबाबत लेखी पत्र दिले.

विविध मागण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर
मुरूम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्यावतीने महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी पुकारलेल्या संपामध्ये बुधवारी (ता. १३) रोजी मुरुमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील कर्मचारी सहभागी झाले. यावेळी रितसर प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांना संपावर जाण्याबाबत लेखी पत्र दिले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयात गेटसमोर एकत्र येऊन शासनाने आमच्या मागण्या मान्य करव्यात अशा घोषणा देवून रोष व्यक्त केला. यामुळे विद्यापीठीय परिक्षेवर परिणाम झाला. तसेच माध्यमाच्या प्रतिनिधीसोबत बोलतांना महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे सचिव दत्तू गडवे म्हणाले की, शासन नेहमीच कर्मचाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत असून वेळोवेळी मागण्या मांडूनही शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू होत नाही. त्यामुळे आम्ही संप पुकारत आहोत. महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबीत असून यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नोकर भरती बंद, सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्ष करावे, मागासवर्गीयांच्या पदोन्नती तात्काळ सुरु कराव्यात, उत्कृष्ठ कामासाठी आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी, खाजगीकरण किंवा कंत्राटीकरणास त्वरीत बंद करावे, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रथालय/ प्रयोगशाळा परिचर यांच्या वेतनश्रेणीच्या त्रुटी त्वरीत दुरूस्त कराव्यात, अश्वासित प्रगती योजना १०/२०/३० त्वरीत लागू करावी आदी मागण्यासाठी संप पुकारण्यात आलेला आहे. या संपामध्ये महाविद्यालयातील कार्यालयीन अधिक्षक राजू ढगे, मुख्य लिपिक सुभाष पालापूरे, श्रीमती सुरेखा पाटील, महादेव पाटील, मल्लिकार्जुन स्वामी, मुनीर शेख, श्रीमती विजयश्री भालेराव, राजानंद स्वामी, आनंद वाघमोडे, प्रभाकर महिंद्रकर, श्रावण कोकणे, दिलीप घाटे, इसाली चाऊस, चंद्रकांत पुजारी आदी कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी लाक्षणिक संपाप्रसंगी सहभागी असताना
