गावगाथा

मुरूम पोलिसांकडून वाहनधारकांना वाहतुकीचे धडे

पोलीस ठाण्याकडून वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमाचे मार्गदर्शन करताना मच्छिंद्र शेंडगे, पवनकुमार इंगळे व अन्य

मुरूम पोलिसांकडून वाहनधारकांना वाहतुकीचे धडे

HTML img Tag Simply Easy Learning    

मुरूम, ता. उमरगा, ता. १५ (प्रतिनिधी) : येथील पोलीस ठाण्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी (ता.१५) रोजी वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्याकरिता मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे, सपोनि पवनकुमार इंगळे यांनी येथील बाजारपेठ, शिवाजी चौक येथे रिक्षा, टेम्पो चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व दुचाकी धारकांना वाहतुकीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांना गुलाब पुष्प देऊन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सपोनि मच्छिंद्र शेंडगे यांनी रस्त्यावर अडथळा होईल अशी वाहने उभी करू नये. वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरू नये. दूचाकीवर हेल्मेटचा वापर नेहमीच करावा व दोन पेक्षा जास्त लोक बसू नये. दारू पिऊन वाहने चालवू नयेत. रस्त्यावरील आखलेल्या पट्ट्यांच्या चिन्हांचा वापर करावा. पालकांनी अठरा वर्षाखालील मुलांच्या हातात वाहन देऊ नये. मोबाईल कानास लावून बोलत वाहन चालवू नये. बाजारपेठेच्या ठिकाणी रहदारीस अडथळा होईल, अशा ठिकाणी वाहनांचे पार्किंग करू नये, असे पार्किंग केलेले आढळल्यास संबंधित वाहनधारक मालकांवर ऑनलाईन दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे उपस्थितांना दक्ष राहण्यासाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहरातून प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनीनी वाहतूक नियमांचे फलक हातात घेऊन शहरातून रॅली काढण्यात आली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. कल्याणी टोपगे, प्रा.करबसप्पा ब्याळे, प्रा. अण्णाराव कांबळे, प्रा. सुधीर नाकाडे, प्रा. दयानंद राठोड आदींनी सहभाग घेतला. पोह नागनाथ वाघमारे, सुखदेव राठोड, आफरीन मुजावर, पोशि संगमेश्वर नाकाडे, संतोष माळी, निळकंठ कटोरे, रमाकांत परीट आदींनी पुढाकार घेतला. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील पोलीस ठाण्याकडून वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमाचे मार्गदर्शन करताना मच्छिंद्र शेंडगे, पवनकुमार इंगळे व अन्य

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button