गावगाथा

विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे. खेळामधून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळले जाते.; चेअरमन बसलिंगप्पा खेडगी

मातोश्री निलव्वाबाई चनबसप्पा खेडगी प्रशालेच्या मैदानावर हिवाळी वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चेअरमन खेडगी बोलत होते.

विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे. खेळामधून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळले जाते.; चेअरमन बसलिंगप्पा खेडगी

अक्कलकोट, दि. १९-विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष दिले पाहिजे. खेळामधून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळले जाते. खेळाने शरीर व मन यांचे संतुलन साधले जाते, असे प्रतिपादन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी केले .

येथील मातोश्री निलव्वाबाई चनबसप्पा खेडगी प्रशालेच्या मैदानावर हिवाळी वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी चेअरमन खेडगी बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुभाष धरणे हे होते. यावेळी संचालिका पवित्रा खेडगी, खेडगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, मुख्याध्यापक जयदीप साखरे, उपमुख्याध्यापिका विजयालक्ष्मी भुसणगी, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या रश्मी कुंभार उपस्थित होते.

प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, क्रिडा साहित्य व क्रिडांगणाचे पूजन करण्यात आले.त्यानंतर क्रिडाज्योत पेटवून विद्यार्थ्यांनी मशाल संचलन केले. तसेच शिशू विहार, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संचलन करत उपस्थित प्रमुख मान्यवरांना मानवंदना दिले. प्रास्तविक भाषणात पर्यवेक्षक रमेश मठपती यांनी शालेय जीवनातील क्रिडा स्पर्धेचे महत्त्व सांगत मानवी जीवनात विविध खेळांच्या सरावाविषयी माहिती दिली.
संस्थेचे सचिव सुभाष धरणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापक जयदीप साखरे यांनी खेळाचे महत्व पटवून दिले आणि शाळा व संस्थेविषयी माहिती दिली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करुन सलामीच्या कबड्डी सामन्याच्या खेळाडूंचा परिचय करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षक रमेश मठपती यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रिडा विभाग प्रमुख ए. एम. तानवडे यांनी मानले. याप्रसंगी प्रशालेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button