अक्कलकोटची हलगी आता राष्ट्रीय स्तरावर कडाडणार..
महाराष्ट्र राज्य कला महोत्सव अंतर्गत राज्यस्तरावरून खेडगी कॉलेज च्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड....

अक्कलकोटची हलगी आता राष्ट्रीय स्तरावर कडाडणार..

महाराष्ट्र राज्य कला महोत्सव अंतर्गत राज्यस्तरावरून खेडगी कॉलेज च्या विद्यार्थ्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड….

अक्कलकोट, दि .१९-
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयाचा बारावी कला शाखेचा विद्यार्थी राहुल सोमनाथ गेजगे याची महाराष्ट्र राज्य कला महोत्सव 2023-24 अंतर्गत राज्यस्तर सादरीकरणातून संगीत वाद्य अंतर्गत हलगी वादन या प्रकारातून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्याचा संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी यथोचित सन्मान केला. प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट, उपप्राचार्य प्रा. बसवराज चडचन उपस्थित होते.

21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत विविध दहा कलाप्रकारांचे राज्यस्तरीय सादरीकरण झाले होते. महाराष्ट्रातील एकूण 237 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यापैकी 19 विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. यामध्ये राहुल गेजगे या अक्कलकोट च्या खेडगी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हलगी वादन प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी राहुल हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी निवड झालेला राहुल हा एकमेव विद्यार्थी आहे. 9 जानेवारी ते 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालभवन नवी दिल्ली येथे ही स्पर्धा होणार आहे.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते राहुल गेजगे याचा सन्मान करण्यात आला. यावेळी सोमनाथ गेजगे, प्रा. विलास अंधारे, प्रा. संजय कलशेट्टी, प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, प्रा. श्रीकांत जिड्डीमनी, प्रा. निलप्पा भरमशेट्टी, एन्. एस. एस. कार्यक्र्माधिकारी प्रा. प्रकाश सुरवसे, प्रा. दत्तात्रय होटकर, प्रा. विजया कोन्हाळी, प्रा. स्नेहा लच्याणे -हेबळे, प्रा. ललिता लवटे, सुहास होटकर, विरुपाक्ष कुंभार उपस्थित होते. यासाठी प्रा. डॉ. सोमनाथ राऊत यांनी परिश्रम घेत या विद्यार्थ्याला मार्गदर्शन आणि सहकार्य केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
