*श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वागदरी येथे क्रीडा सप्ताहास उत्साहात प्रारंभ.*
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले, क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आले

*श्री एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वागदरी येथे क्रीडा सप्ताहास उत्साहात प्रारंभ.*

प्रशालेत आंतरवर्गीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संस्थेचे माजी चेअरमन श्री मल्लिनाथ शेळके सावकार, जेष्ठ संचालक सर्वश्री भाऊराव पाटील, डॉक्टर शरणकुमार वरनाळे,प्राचार्य श्री देशमुख सर, पर्यवेक्षिका सौ जाधव मॅडम यांच्या उपस्थितीत क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. सुरुवातीस कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पुजारी सर यांनी केले प्रास्ताविकात पुजारी सरांनी खेळाचे महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे असे नमूद केले यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले, क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आले त्याप्रसंगी क्रीडा विभाग प्रमुख श्री सोनकवडे सर यांनी मैदानावरील विविध खेळांचे नियोजन स्पष्ट केले. त्या नियोजनाप्रमाणे प्रशालेत क्रीडा स्पर्धा सुरू करण्यात आल्या. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते
