ऊसतोड कामगारंच्या सोबत मुलांच्या वाढदिवस साजरा करून कामगारांना दिले गोड जेवण
जय हिंद साखर कारखाना आचेगाव एग्री ओर्शेयर मंत्राजात तोरणगीचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

ऊसतोड कामगारंच्या सोबत मुलांच्या वाढदिवस साजरा करून कामगारांना दिले गोड जेवण

जय हिंद साखर कारखाना आचेगाव एग्री ओर्शेयर मंत्राजात तोरणगीचे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

मुलगा नंदीश तोरणगीचे 8 वा वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिले आशीर्वाद..


अक्कलकोट :-
तालुक्यातील तडवळ गटाचे एग्री ओर्शेयर मंत्राजत तोरणगी यांनी स्वतःच्या मुलाचा 8 वाढदिवस ऊसतोड कामगारांच्या सोबत चालू उसाच्या फडात साजरा करून सर्व कामगारांना गोड जेवण देऊन माणुसकीची दर्शन घडविले आहे.
सध्याचा धावफळीच्या जीवनात स्वतःचे आई वडील,भाऊ बहिण या नात्याचे लोकांना पाहायला,भेटायला आणि बोलायला वेळ नसल्याचे अनेक लोकांना आपण पाहतो.परंतु जयहिंद साखर कारखान्यात मागील अनेक वर्षापासून तडवळ गटाचे एग्री ओरशेयर म्हणून कार्यरत असलेले मंत्रजात तोरणगी या अधिकाऱ्याने स्वतःचे मुलाचे वाढदिवस ऊसतोड कामगाांच्या सोबत उसाच्या फडात साजरा करून सर्व कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गोड बालुशा जेवण देऊन ऊसतोड कामगारांच्या प्रती माणुसकीच्या दर्शन घडविले आहे. या अनोख्या वाढदिवस उपक्रमाला जय हिंद कारखान्याचे चेअरमन गणेश माने देशमुख,बाब्रुवान काका माने देशमुख,कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.पी.देशमुख ,शेती अधिकारी जेऊरे साहेब, एग्री ओरशेयर श्रीशैल रब्बा समवेत कारखान्याचे सहकारी शुभेच्छा देऊन उपक्रमाचे स्वागत केले आहे.

फोटो ओळ :-
ऊसतोड कामगारंच्या सोबत उसाच्या फडात मुलांच्या वाढदिवस साजरा करताना जयहिंद साखर कारखान्याचे तडवळ गटाचे एग्री ओरशेयर मंत्रजात तोरणगी , नंदीश तोरणगी आणि ऊसतोड कामगार.