रत्नकांत विचारे व अर्चना जाधव शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित
कला काव्य जनजागृती संस्था यांच्या वतीने सानपाडा वाशी येथे आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार संस्थापक मंगेश चांदिवडे आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात देऊन सन्मानित करण्यात आले

रत्नकांत विचारे व अर्चना जाधव शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

कुर्ला गांधी बाल मंदिर हायस्कूल मधील शिक्षक रत्नकांत विचारे आणि अर्चना जाधव या दोघांना नुकताच पारस कला काव्य जनजागृती संस्था यांच्या वतीने सानपाडा वाशी येथे आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार संस्थापक मंगेश चांदिवडे आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात देऊन सन्मानित करण्यात आले.याआधी देखील विचारे सर आणि जाधव मॅडम यांना अनेक पुरस्कार मिळालेले असून दोघानाही ३१ वर्ष शिक्षकी पेशाचा अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविलेले आहेत.पुरस्कार मिळाल्याने या दोघांचेही शाळेतील अनेकांनी, मित्र परिवाराने आणि नातेवाईकांनी अभिनंदन केले असून असे मेहनती व होतकरू शिक्षक आमच्याकडे असल्याचा शाळेला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे गांधी बाल मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ यांनी सांगितले आहे.
